मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आलेला निधी तलाठी यांच्याकडून कमी अनुदान देणे आदी तक्रारी आल्याने

याप्रकरणी चौकशी करुन यात तथ्य आढळून आल्याने मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी, निंबोणी येथील तलाठी बी. के. कुंभार यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात यंदा अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेकरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी अधिकारी यांना दिले होते.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन, शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तलाठी कुंभार यांच्याकडून शेतकऱ्यांना शासन नियमांपेक्षा कमी अनुदान रक्कम देणे आदी तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.

शेतकरी ब लोकप्रतिनिधी यांच्याकडून आलेल्या तक्रारीची चौकशी प्रांताधिकारी यांच्या स्तरावरुन करुन याबाबत तलाठी कुंभार यांच्या निलंबनाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

तलाठी कुंभार यांनी केलेली चूक गंभीर असल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

एकीकडे अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. यात पिकांसह यंदा अन्य संसारपयोगी व कृषी साहित्यांचाही नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच बेठीस धरण्याचा प्रयत्न तलाठी यांच्याकडून होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी पहिल्यांदाच कारवाईचा मोठा बडगा हाती घेतला आहे.

यामुळे कामचुकार व लाचखोर तलाठी यांच्यात अस्वस्थता पसरली असून त्यांनी जिल्हाधिकारी यांचा चांगलाच धसका घेतला आहे.
तलाठी कुंभार यांच्यावर ‘हा‘ ठपका
अतिवृष्टी अनुदान वितरणातील अनियमितता व गैरवर्तन चूक करुन लाभार्थ्यांना शासन नियमांपेक्षा कमी अनुदान रक्कम देणे.
नागरिकांशी उद्धट वर्तन करणे, तसेच तहसिलदारांच्या आदेशाची चुकीची अंमलबजावणी केल्याने त्यांनी मयत व्यक्तीच्या नावाऐवजी जिवंत व्यक्तीचे नाव कमी कले आहे.

तसेच वारस नोंद क्र. 325 नोंदविताना मयत व्यक्ती रेवणसिध्द चनबसू विरुनगी यांचा मृत्यु दाखला अपलोड न करता वारस नोंद क्र. 325 मंडळ अधिकारी मरवडे यांचेकडे निर्गतीसाठी पाठविण्यात आली आहे.
नोंदी निर्गत करताना वारंवार विलंब करुन महराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प ई फेरफार प्रणालीतील फेर फार नोंदी जलद गतीने निपटारा करण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













