mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महालिंगराया यात्रेसाठी पायी चालत निघालेल्या भाविकांना चाकी वाहनाने चिरडले; तिघांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 1, 2021
in मंगळवेढा, क्राईम
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील यात्रेस पायी चालत निघालेल्या तीन भाविकांना एक चार चाकी वाहने चिरडले असून तिन्ही भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

पायी चालत वारी करणे अथवा देवाच्या दर्शनाला जाण्यात भाविकांची मोठी श्रद्धा असते पण पायी चालत जाणाऱ्या भाविकांना रस्त्यात अपघात होतात. पंढरीच्या वारीला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते आणि अशावेळी त्यांना ट्रकने चिरडल्याच्या असंख्य घटना आजवर घडल्या आहेत. अशाच प्रकारची दुर्दैवी घटना जत तालुक्यातील उमदीजवळ घडली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया यात्रेसाठी पायी चालत निघालेल्या भाविकांना अपघाताला सामोरे जावे लागले. हुलजंती येथे महालिंगराया आणि बिरोबा गुरु शिष्य भेटीचा पालखी सोहळा आठवडाभर सुरु असतो.

या यात्रेसाठी कर्नाटक राज्यासह आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गोवा आदी राज्यातून भाविक येत असतात.

मंगळवेढा तालुक्यातील ही यात्रा महत्वाची मानली जाते त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते.  याच यात्रेसाठी कर्नाटकातून निघालेल्या भाविकांवर उमदी पासून दोन किमी अंतरावर काळाचा घाला घातला गेला.

उमदीयेथून हे भाविक पायी जात असतानाचा पुण्याहून रायचूरच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच १२ एमडब्ल्यू ८५९८) एका चार चाकी वाहनाच्या अपघाताचे बळी पडावे लागले आहे. उमदी – मंगळवेढा रस्त्यावर हा विचित्र अपघात झाला आहे.

भरधाव वेगाने निघालेल्या चार चाकी गाडीचा टायर अचानक फुटल्याने अत्यंत भयानक आणि भीषण अपघात घडला. टायर फुटल्याने हे चार चाकी वाहन अनियंत्रित झाले आणि पायी चालत जाणारऱ्या भाविकांच्या अंगावर गेले.

दिशाहीन झालेल्या या वाहनाने अक्षरशः या भाविकांना चिरडले आणि तीनही भाविक जागीच  ठार झाले. या कारने एका मोटार सायकलस्वारालाही धडक दिली नंतर हे वाहन आडवे होऊन भाविकांच्या दिंडीत घुसले, दिंडीतील तिघांना या वाहनाने चिरडले आणि एकच गोंधळ उडाला.

लिंगसूर तालुक्यातील यादभावी येथील ३२ वर्षे वयाचे बसवराज उर्फ बसप्पा दुर्गाप्पा चिंचवडे, आणि नागप्पा सोमण्णा अचनाळ (वय ३४), देवभुसर येथील ४० वर्षे वयाचे म्हानाप्पा दुर्गाप्पा गोंदीकल हे तिघेजण या अपघातात जागीच ठार झाले.

या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कार चालक जखमी झाला आहे. अपघात होताच उमदी येथून मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी जखमींना मदत केली.

या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून पायी यात्रा करणाऱ्या भाविकांसाठी पुन्हा एकदा धोक्याची मोठी सूचना मिळाली आहे.

पंढरपूर येथील प्रत्येक यात्रेच्या वेळी राज्याच्या विविध भागातून भाविक पायी चालत येत असतात. महिन्याच्या एकादशीच्या निमित्तानेही पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या आधी अशा भाविकांना मोठ्या वाहनांनी चिरडण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत पण आता हा धोका अधिक वाढला आहे.

राज्यातील बहुतेक महत्वाचे रस्ते सिमेंटचे बनविण्यात आलेले असून ते रुंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून धावणारी वाहने अत्यंत वेगाने धावत असतात.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा अपघात

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
Next Post
सिध्देश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त 132 रक्तदात्यांनी केले रक्तदान; प्रशांत गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम

सिध्देश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त 132 रक्तदात्यांनी केले रक्तदान; प्रशांत गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..