टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पाच तालुक्यातील निर्बध कडक करण्याचा निर्णय घेतला.
परंतु, करमाळा वगळता माळशिरस , पंढरपूर, सांगोला व माढा तालुक्यातील रुग्णवाढ कायम आहे. सोमवारी ग्रामीणमध्ये ५५६ तर शहरात दोन रुग्ण वाढले असून ग्रामीणमधील सहा तर शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी ग्रामीणमध्ये अक्कलकोट तालुक्यात दोन , उत्तर सोलापुरात तीन , दक्षिण सोलापुरात चार , बार्शी तालुक्यात २७ , मंगळवेढ्यात सात , मोहोळ तालुक्यात २२ रुग्ण वाढले आहेत.
तसेच करमाळा तालुक्यात ५८ , माढा तालुक्यात १३८ , माळशिरस तालुक्यात ९ ८ आणि पंढरपूर तालुक्यात १०७ नवे रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंत ग्रामीणमधील १ ९ लाख ३२ हजार ४३२ संशयितांची तर शहरातील चार लाख ५० हजार ७२८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
त्यात ग्रामीणमध्ये एक लाख ५७ हजार १४० तर शहरात २ ९ हजार ७६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे शहरातील एक हजार ४३८ तर ग्रामीणमधील तीन हजार २४६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे ग्रामीणमधील एक लाख ४८ हजार ८२५ तर शहरातील २७ हजार ५८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता शहरातील ५२ तर ग्रामीणमधील पाच हजार ६ ९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सोमवारी म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण वाढला असून या आजाराची रुग्णसंख्या आता ६४८ झाली असून त्यापैकी ९ ० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ५२२ रुग्णांनी या आजारावर मात केली असून सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.(स्रोत:सकाळ)
बेशिस्तांवर काटेकोर वॉच नाहीच
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तालुक्यातील निबंध कडक केले. त्यानंतर कोरोना चाचण्या वाढविल्या , परंतु बेशिस्तांवर वॉच ठेवण्यात प्रशासनाला म्हणावे तितके यश मिळालेले नाही.
होम क्वारंटाईनमधील अनेकजण बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे अनेकदा पहायला मिळाले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी वेगळी यंत्रणा अजूनही दिसत नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज