मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी ४० हजाराची लाच घेणाऱ्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सोमवारी रंगेहाथ पकडले.
ही कारवाई सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ५२) असे अॅटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या निवासी नायब तहसीलदाराचे नाव आहे.
तक्रारदार मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी हेडगिरे याने ६० हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती ४० हजार रुपये ठरले होते. ती घेताना काल सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले.

हेडगिरे याला ताब्यात घेऊन सोलापूर शहरातील अँटी करप्शन कार्यालयात नेण्यात आले असून पुढील कार्यवाही वेगाने सुरू आहे.

विशेष म्हणजे पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला अशी जोरदार अफवा पसरली होती.
परंतु ती अखेर अफवाच निघाली. लगेच दोन दिवसांनी उत्तर तहसील कार्यालयातच ही कारवाई झाली आहे.

दरम्यान मंगळवेढा येथेही असताना दोघांना लाचलुचपत विभाग आसल्याची कुणकुण लागताच सदर अधिकारी याने फरार होवून बदलीसाठी विशेष प्रयत्न केले व बदलीचा आदेश घेवून तो उत्तर सोलापूर येथे सुखरूप हजर झाला. सेतू, महा-ईसेवा चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिल्याचे बोलले जात आहे.
मात्र उत्तर तहसीलमध्ये तो वाचू शकला नाही, अखेर त्याच्यावर लाचलूचपत विभागाची कारवाई झालीच.
घरात सापडली ६० हजारांची कॅश
कारवाई झाल्यानंतर लगेच हेडगिरे याच्या घराची झडती घेण्यात आली. यांसाठी टीमने घेतलेल्या झडतीमध्ये जवळपास ६० हजार रुपयांची कॅश आढळली. याशिवाय इतर काही ऐवज सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












