टीम मंगळवेढा टाईम्स ।
महावितरण मंगळवेढा तालुक्याचा उपकार्यकारी अभियंता पदाचा पदभार महेश सूर्यकांत शिपुरे यांनी स्वीकारला आहे. यापूर्वी ते सहाय्यक अभियंता म्हणून पंढरपूर येथे कार्यरत होते. कार्यकारी अभियंता बाळासाहेब चोरमुळे यांची वाई येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
महेश शिपुरे यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर सहाय्यक अभियंता म्हणून जत, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात रूजू झाल्यानंतर महेश शिपुरे यांनी आपल्या 19 वर्षाच्या सेवेत पदोन्नतीवर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे सहाय्यक अभियंता म्हणून काम केले आहे.
कामाचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाय सांगली, कोल्हापूरला आपात्कालीन परिस्थितीत काम करण्याच्या अनुभवाचा फायदाही तालुक्यातील ग्राहकांना होणार आहे.
मुळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले महेश शिपुरे यांची महावितरण मंगळवेढा तालुक्याच्या उपकार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. वीज सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहक सेवेला प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पदभार स्विकारल्यानंतर ठेकेदार प्रशांत गडकर, उल्लास पाटील, दादा इंगळे, संतोष पवार, विजय मिसाळ, संभाजी नागणे आदींनी सत्कार केला आहे.
जिल्हा सेपक टकरा स्पर्धेत इंग्लिश स्कूल, मंगळवेढा चार गटात प्रथम
जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलने चार गटात प्रथम तर दोन गटात द्वितीय क्रमांक मिळविला.
१४ वर्षे वयोगटात नूतन हायस्कूल बोराळे संघाचा पराभव करत विजेतेपद मिळवले. या संघात कर्णधार समरजीत कदम, अथर्व तोडकरी, गणेश बिले, अजिंक्य कोलगे, विश्वजीत वाघ यांचा समावेश होता. मुलींमध्ये माध्यमिक आश्रम शाळा येड्राव संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
या संघात कर्णधार भक्ती नागणे, वैष्णवी वाघ, सई कोळी, पूर्वी जाधव, प्रज्ञा भुसे यांचा समावेश होता. १७ वर्षे वयोगटात माध्यमिक आश्रम शाळा येड्राव संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
या संघात कर्णधार शिवतेज कदम, ओम नागणे, सुयोग धोत्रे, वैजिनाथ उन्हाळे, राहुल उन्हाळे यांनी उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद मिळविले. १७ वर्षे वयोगटात मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले. यामध्ये कर्णधार भक्ती घुले, प्रणिती नागणे, आनंदी हेंबाडे, अश्लेषा भोसले, श्रावणी नेहरवे यांचा सहभाग होता.
१९ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या संघात कर्णधार सिद्धांत धसाडे, अरमान मुजावर, सुजित कदम, अभिजित कांबळे, रेहान इनामदार यांचा सहभाग होता. १९ वर्षे मुलींच्या संघात कर्णधार तेजश्री नागणे, तंजीला शेख, रिद्धी वाघमोडे, आयुषी भुसे, आर्या क्षीरसागर यांचा सहभाग होता.
या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक दीपक शिनगारे, महादेव फुलारी ज्ञानेश्वर मेटकरी, धनंजय यादव अमित जावळे, श्रीकांत काळुंगे, आण्णा वाकडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित (बापू) कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक,
संचालिका डॉ- मीनाताई कदम, संचालिका तथा इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम, प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने यांनी कौतुक केले.
या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू, क्रीडाधिकारी तानाजी मोरे माध्यमिक आश्रम शाळा येड्रावचे प्राचार्य प्रशांत यादव, बापूराव बाबर यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज