टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी महापूजेसाठी आज गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते मंगळवेढा तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
विशेष म्हणजे प्रथमच ते मंगळवेढा तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. एकदिवसीय दौऱ्यात दोन्ही तालुक्यातील कार्यक्रमास ते हेलिकॉप्टरने जात आहेत.
उद्या शुक्रवारी आमदार समाधान आवताडे यांच्या आवताडे शुगर्सचा गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत.
या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांना ताकद देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असणार आहे. मंत्रीमंडळ विस्तार असल्याने फडणवीस यांनी राजकीय संकेत देणार का, अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील नवीन चेहऱ्यालाच संधी मिळेल अशी चर्चा आहे. या सरकारने वापरलेले धक्कातंत्र कायम राहीले तर आमदार समाधान आवताडे यांनाही लॉटरी लागू शकते. त्यामुळे फडणवीस यांच्या दौऱ्यातून राजकीय संकेत मिळतील का अशी चर्चा आहे.
मुंबईहून विशेष विमानानेव आज गुरूवारी सायंकाळी ५ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. हेलिकॉप्टरने पंढरपूरला जातील.
पंढरपूर येथे ६ वाजता कोर्टी येथे रस्ता कामाचे भूमिपूजन करतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पंढरपूर विकास आराखडा बैठक घेणार आहेत.
शुक्रवारी पहाटे २ वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा करतील, पहाटे ५ वाजता संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रेचा शुभारंभ ते करणार आहेत.
सकाळी ११ वाजता काव्यतीर्थ आचार्य वेदान्तवाचस्पति पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या मूर्तीचे अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दुपारी १२ वाजता नंदूर ता.मंगळवेढा येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता बार्शीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. दुपारी सव्वा दोन वाजता डॉ . कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलला भेट देणार आहेत.
अडीच वाजता सोयाबीन प्रक्रिया उद्योग उदघाटन सोहळ्यास उपस्थिती असणार आहे. दुपारी ३ वाजता गांधी पुतळा येथे जाहीर सभेस मार्गदर्शन करतील.
सोलापूरचाच पालकमंत्री देण्याचा विचार होणार का ?
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात जिल्ह्यातील नवीन चेह – यालाच संधी मिळेल अशी चर्चा आहे. त्यात आमदार समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते ही नावे पुढे आहेत.
या सरकारने वापरलेले धक्कातंत्र कायम राहीले तर आवताडे यांनाही लॉटरी लागू शकते. त्यामुळे फडणवीस यांच्या दौऱ्यातून राजकीय संकेत मिळतील का अशी चर्चा आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज