टीम मंगळवेढा टाईम्स।
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना वाढदिवसा अगोदरच महायुती सरकारने मोठे पाठबळ दिले आहे. विठ्ठल सहकारी कारखान्याच्या 347 कोटी रुपयांच्या कर्जाची राज्य सरकारने थकहमी घेतली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीने या थकहमीच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँकेने (राज्य सहकारी बॅंक) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती.
तसेच, कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली होती, त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्टया अडचणीत सापडला होता.
त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
भाजपसोबत गेल्यानंतर काही दिवसांनंतर राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईला स्थगिती मिळाली होती. अभिजीत पाटील यांनी भाजपसोबत जाऊन माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता.
त्या पाठिंब्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन दिले होते,
त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात ‘एनसीडीसी’कडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयांची थकहमी अर्थात ‘मार्जिन लोन’ मंजूर करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनंतर विठ्ठल सहकारी कारखान्याला 347 कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्या 347 कोटी रुपयांतून राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्जाचे हप्तेही फेडले जाऊ शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीसांनी शब्द पाळला
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला हेाता. फडणवीस यांनी तो शब्द पाळला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील यांना महायुती सरकारकडून मोठे पाठबळ मिळाले आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महायुतीकडून अभिजीत पाटील यांना संधी दिली जाते का हे पाहावे लागणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज