टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज तालुक्यात एकूण 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा झालेल्या बोराळे गावातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
दिगवंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार यंत्रणा राबवित आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा झालेल्या गावात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले @Info_Solapur @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis @ChDadaPatil @CMOMaharashtra pic.twitter.com/YT9ctRoIqA
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) April 9, 2021
दरम्यान अनेक उमेदवार हे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत गर्दी जमवत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंगळवेढ्यात आले होते.
त्यांनी आज सकाळी 11 वाजता बोराळे गावात जाहीर सभा घेतली होती. सभेस नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
दरम्यान त्यांनी घेतलेल्या बोराळे गावातील 8 जण पॉझिटिव्ह आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बोराळे गावातील पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती सभेस उपस्थित होते का ? याचा शोध घेण्याचे आवाहन प्रशासना समोर होऊ घातले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज