टीम मंगळवेढा टाईम्स ।
रतनचंद शहा सहकारी बँकेच्या सर्व खातेदार यांच्या ठेवी सुरक्षित असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी दिली.
रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा बँकेचे सर्व सभासद, टेवीदार यांना निवेदन – बँकेने केलेल्या शाखांच्या टेस्ट ऑडीटमध्ये आपल्या बँकेच्या टेंभुर्णी शाखेमध्ये अफरातफर झाल्याची घटना घडल्याचे मागील आठवड्यात उघडकीस आले आहे.
दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेवर बँकेने तातडीने कायदेशीर कारवाई सुरू केली असून संबंधित आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
तसेच वसुलीची कारवाई सुरू केली आहे. रतनचंद शहा सहकारी बँक लि.मंगळवेढा या बँकेची स्थापना सन १९६२ साली झाली असून गेली ५८ वर्ष बँक उत्तम रितीने चालू आहे. बँकेच्या ११ शाखा असून त्या सक्षमपणे चालू आहेत. बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम असून बँकेचे नेटवर्थ चांगले आहे.
उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यास बँक सक्षम आहे. सद्या बँकेकडे २८८.०० कोटी इतक्या ठेवी आहेत. सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत.
समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या अफवांवर/मजकुरावर विश्वास ठेवू नये, कोणासही काही शंका असल्यास आपण समक्ष बँकेत येवून भेटावे.आपल्या ठेवी सुरक्षित आहेत व राहतील, याची आम्ही हमी देत आहोत असल्याची माहिती चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळांनी दिली आहे.
दरम्यान कुठल्याच खातेदार अथवा ठेवीदारांना कसलाच धोका नाही.त्यामुळे कोणत्याच अफवांवर विश्वास न ठेवता सर्व खातेदारांनी व्यवहार करावा आपला व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज