mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय खळबळ! महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरल्याप्रकरणी ‘या’ उमेदवारावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2024
in राजकारण, राज्य, सोलापूर
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून अधिकृत उमेदवार असल्याचे भासवून प्रचार, सभेतून मतदारांची दिशाभूल करीत आहेत.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीतून सांगोला विधानसभेची जागा उद्धवसेना पक्षाला दिली असून, दीपक बापूसाहेब साळुंखे पाटील यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म सोबत जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला, तो मंजूरही झाला.

त्यानंतर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तोही मंजूर झाला.

दरम्यान शेकाप उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख हे जाणीवपूर्वक सांगोला मतदारसंघात आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवीत आहेत. प्रचाराच्या सर्व साहित्यावर जाणीवपूर्वक महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून प्रचार,

सभेतून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहरप्रमुख तुषार इंगळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोरे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय पवार यांनी केला आहे.

उद्धवसेनेच्या पत्रिकेत नाव, उपस्थिती मात्र काडादींकडे

■ उद्धवसेनेचे सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी हत्तूरमध्ये झाला. या कार्यक्रमासाठी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. या पदाधिकाऱ्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत होती.

परंतु, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष हरिश पाटील, भीमाशंकर जमादार हे काँग्रेस नेते अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमाला हजर होते. या नेत्यांची भाषणेही झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत

महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन प्राप्त झाले असून कोण उमेदवार अधिकृत आहे याबाबतचा खुलासा महाविकास आघाडीतील नेत्यांनीच करायला पाहिजे. निवडणूक आयोग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. – भैरप्पा माळी, निवडणूक निर्णय अधिकारी, सांगोला

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र

पराभव समोर दिसू लागल्याने आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहोत, हे सांगण्याचा शिवसेना उबाठा उमेदवाराकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हतबल झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

परंतु सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत. कोण अधिकृत उमेदवार आहे, याबाबतचा खुलासा येत्या दोन दिवसात होईल. डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप, उमेदवार

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाविकास आघाडी

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आधी तीनही मुलांना विष पाजले; नंतर स्वतः पिऊन पित्याने जीवन संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना; तिघांवर उपचार सुरू

April 3, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Next Post
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

मोठी बातमी! मंगळवेढ्यात समविचारी आघाडीचा आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा