टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत खुलेआम वेश्या व्यवसाय गेल्या सहा महिन्यापासून सुरु असल्याने
या परिसरातील तरूण व बाहेरील नागरिक येथे येत असल्याने तरूण पिढी बरबाद होत आहे.
हा वेश्या व्यवसाय पोलिसांनी तात्काळ बंद करून संतांच्या भूमीचे पावित्र राखावे व बरबाद होणारी तरूण पिढी वाचवावी अशा आशयाचे निवेदन जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरभैय्या देशमुख यांनी मंगळवेढा पोलिसांना दिले आहे.
मंगळवेढा शहर हद्दीत 8 कि.मी. अंतरावर गेल्या सहा महिन्यापासून एका साखर कारखान्यातील एजंट कामगाराने कर्नाटक राज्यातील व अन्य ठिकाणाहून महिला येथे आणून वेश्या व्यवसाय सुरु केला आहे.
या महिला राष्ट्रीय महामार्गालगत अश्लिल चाळे करीत थांबत असल्यामुळे येणार्या जाणार्या नागरिकांचे व महिलांचे लक्ष जात असल्याने त्यांना हे दृश्य पाहून लाजीरवाणे वाटत आहे.
येथूनच येणारे कॉलेजची मुले, मुली जात येत असल्याने त्यांच्या मनावर याचा परिणाम होत असल्याचा बोलबाला आहे.
मंगळवेढा भूमीत 18 संत होवून गेल्याने राज्यभर संतांची भूमी म्हणून येथे ओळख असताना सहा महिन्यापासून हा व्यवसाय सुरु असल्याने ज्येष्ठ नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी नव्याने कार्यभार स्विकारताच दामाजी कारखाना परिसरात वेश्या व्यवसायावर छापे टाकून त्या दलालास गजाआड केले होते.
महामार्गालगतच वेश्या व्यवसाय असल्याने दोन्ही बाजूने येणार्या जाणार्या महिला वर्गाना व पुरुषांना नको ते दृश्य पहावे लागत असल्याने
पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होवून या व्यवसायाबाबत आत्तापर्यंत पोलिस अनभिज्ञ कसे काय? असा सवालही केला जात आहे.
या दिलेल्या निवेदनावर प्रभाकरभैय्या देशमुख, नाना बिचुकले, सुरेश जाधव, सर्जेराव गाडे आदींच्या सह्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज