मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क।
लोकसभेचा निकाल मविआच्या बाजूने लागल्यावर महायुतीतील अनेकजण विधानसभेच्या उमेदवारीसाठी मविआकडे गेले होते. राज्यातही महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा त्यांना विश्वास होता. प्रत्यक्षात उलटेच घडले. महायुतीने दणदणीत विजय मिळवला.
केंद्रातही महायुतीचेच सरकार आहे. त्यामुळे मविआकडे जाऊन पराभूत झालेले अनेकजण ‘मुंगळ्याची पावले सत्तेच्या गुळाकडे’ यानुसार हालचाली करत आहेत, अशी चर्चा सुरू झाली असल्याचे वृत्त आज दिव्य मराठीने प्रसिध्द केले आहे.
त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात गेलेले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, छत्रपती संभाजीनगरचे सतीश चव्हाण, माढ्याचे अभिजित पाटील यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे, अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनीही नुकतीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे थोरातही काही निर्णय घेऊ शकतात. उद्धवसेनेचे अनेक जण निकाल लागताच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असे म्हटले जात आहे.
राजकारण सत्तेसाठीच असते. अजित पवार सत्तेत राहण्यासाठीच महायुतीत सहभागी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काही इच्छुकांना आपल्यासोबत थांबा, अशी विनंती केली होती, पण त्यांनी नकार दिला होता. फडणवीस, बावनकुळे यांनीही भाजप सोडणाऱ्यांना काही वेळ थांबा, असे म्हटले होते.
त्यांनीही ऐकले नाही. पक्षांतर करून त्यातील काहीजण पराभूत झाले. काहींनी विजय मिळवला असला तरी त्यांना राज्य आणि केंद्रातील सत्तेचा लाभ हवा आहे. त्यामुळे ते पुन्हा महायुतीकडे वळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मोहिते पाटलांच्या हकालपट्टीसाठी मोहीम
आ.रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभेला भाजपविरोधात गेले. विधानसभेला माळशिरस मतदारसंघात त्यांनी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना निवडूनही आणले. त्यांच्या पक्षातून हकालपट्टीची मोहीम पराभूत उमेदवार राम सातपुतेंनी सुरू केली आहे. म्हणून मोहीतेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची भेट घेतली
विठ्ठल कारखान्यावर ३४७ कोटींच्या थकहमीचे ओझे
एप्रिलमध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ३४७ कोटी रुपयांची थकहमी फडणवीसांनी घेतली होती. म्हणून त्यांनी महायुतीचे काम केले. विधानसभेत त्यांनी अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा ३० हजार मतांनी पराभव केला. ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळ्यात ते उपस्थित होते, असे म्हटले जाते.
हर्षवर्धन पाटील सहकुटुंब फडणवीसांकडे
हर्षवर्धन पाटील यांनी धीर धरावा, हा फडणवीसांचा सल्ला झुगारून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटातर्फे इंदापुरातून विधानसभा लढले. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणेंनी त्यांचा १९ हजार मतांनी पराभव केला. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी पत्नी भाग्यत्री, पुत्र राजवर्धन, मुलगी अंकिता पाटील-ठाकरे यांच्यासह फडणवीसांची भेट घेतली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज