टीम मंगळवेढा टाईम्स।
पाच वर्षाच्या मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे घडली आहे.
अर्णव सचिन माने असे त्याचे नाव आहे. त्याला दोन बहिणी आहेत. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली ही घटना घडली. माने कुटुंब कोळगाव येथे राहतात.
अर्णव हा मामाच्या मुलांबरोबर घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. खेळत असताना तो शेडमधील अँगललला लोंबकळत होता.
तेव्हा वरील बाजूला साप होता हे त्याला दिसले नाही . तो ज्या अँगलला लोंबकळत होता त्याच्याच वरील बाजूला असलेल्या सापाने त्याला दंश केला. त्यानंतर त्याने हा प्रकार आपल्या आजोबांना सांगितला.
त्याला तत्काळ करमाळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला अकलूज येथे नेले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
या मृत्यूमुळे कोळगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्णव जेव्हा लोंबकळत होता, तेव्हा त्याचे आजोबा त्याला लोंबकळू नको असे सांगत होते.
मात्र अर्णव मला उंची वाढवायची आहे. म्हणून लोंबकळत राहिला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील सचिन माने व त्यांच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही.
बार्शीत मारहाणप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा
बार्शी येथे लातूर – कुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या दोघा मित्रांना हॉटेलमधील इतर सहा जणांनी उसन्या पैशाची मागणी केली.
पैसे न दिल्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली . याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपक घोलप यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना २ ९ जून रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली.
अमोल झांबरे, तुळशीराम भोसले, महेश गुंड, मयुर धामणेकर, केतन धामणेकर, भैय्या गावडे (सर्व रा.उपळाईरोड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हॉटेल राधेगौरी येथे घोलप व सोनू जगताप जेवणासाठी गेले होते . ते हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीपासून तिथे अन्य सहाजण उपस्थित होते. फिर्यादी व त्यांचे मित्र जेवत असताना तिथे हे सर्व जण आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज