टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराला निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री दत्ता भरणे
मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची गोव्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे.ते आज कोरोना आढावा बैठकीसाठी मंगळवेढ्याला आले याप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी विठ्ठल शुगरचे चेअरमन भगीरथ भालके,नगराध्यक्षा अरुणा माळी, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,माजी नगरसेवक विजय खवतोडे,राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे लतीब तांबोळी,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा अनिता नागणे,तालुकाध्यक्ष भारत बेदरे,शहराध्यक्ष मुजमिल काझी, दामाजी शुगरचे माजी संचालक बसवराज पाटील,अँड.शिवानंद पाटील,राहुल सावंजी,सचिन शिंदे आदीजन उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे बोलताना म्हणाले की,दिगवंत आ.भारत भालके यांनी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी मागण्या केल्या होत्या.पण कोरोनाच्या काळात हे काम लांबले होते.
त्यांनी केलेल्या मागण्या आज मी पूर्ण करून देत आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.शासनाच्या वतीने निधी उपलब्ध होईल पण पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारातून शहराच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दलीत वस्तीसाठी निधी,नगर उत्तन निधी,क्रीडांगण निधी आदी विकास कामासाठी सर्व निधी दिला जाणार असून अण्णाभाऊ साठे नगर वस्तीला विकासासाठी भरपूर निधी मंजूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी : पालकमंत्री दत्ता भरणे
कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाची मोहीम आणखी प्रभावी करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवेढा येथे केल्या.
मंगळवेढा तालुक्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री.भरणे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
तहसीलदार कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला नगराध्यक्षा अरुणा माळी, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे,डॉ.प्रमोद शिंदे, मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, मंगळवेढा मोठा तालुका आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा.
आरोग्य यंत्रणा प्रभावी करण्याबरोबरच स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचीही मदत घेण्यात यावी. उपचार वेळेत होण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे.
लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
कॉंटेक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. एका रुग्णांच्या पाठीमागे किमान वीस लोकांचे ट्रेसिंग करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या यंत्रणांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विठ्ठल शुगरचे चेअरमन भगिरथ भालके यांनी विविध सूचना मांडल्या.
उपविभागीय अधिकारी श्री. भोसले यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी चव्हाण यांनी त्यांच्या विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज