मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकूण असे १ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेले. ही घटना दि.७ डिसेंबर रोजी घडली.

याबाबात सुनील विष्णू खंदारे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुनिल विष्णु खंदारे हे सेवानिवृत्त शिक्षक असून चांभार गल्ली, मंगळवेढा येथे

राहत असून दि.५ ते दि.७ डिसेंबर रोजी दरम्यान राहते घराचे दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली १३.३२० ग्रॅम वजन असलेली

९९ हजार ६०० रुपये किंमतीची एक सोन्याची वेल व टॉप्स जोडी, ३.८३० ग्रॅम वजन असलेली २४ हजार ९०० रू. किंमतीची एक सोन्याची टॉप्स जोडी

तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालचोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













