mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक गटाची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 30, 2020
in सोलापूर, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स । 

येत्या दोन-तीन महिन्यात होणाऱ्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे.

त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच कारखान्याच्या निवडणुकीची हालचालही सुरू झाली आहे. सहकारातील संस्था कशा चालवायच्या, याचा आदर्श परिचारक घराण्याने जपला आहे.

दिवंगत मारवडी वकील व दिवंगत रतनचंद शहा यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्‍यातील लोकांना सोसायटी कर्जातून भागभांडवल उभा करून हा कारखाना चालवला.

संपूर्ण जग कोरोना महामारीत घरात बसले असताना, दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळाने 19 हजार सभासदांना अक्रियाशील करत मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी पोस्टाने नोटिसा पाठवून 28 हजार सभासदांपैकी मोजकेच नऊ हजार सभासद ठेवले.

त्यातील चार ते पाच हजार लोकांच्या नावावर कारखान्याचा ऊस दाखवत बोगस क्रियाशील सभासद करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात संत दामाजी कारखान्याचे संचालक मंडळ यशस्वी ठरले.

सध्या दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांतील सभासद मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी हा निर्णय घेतला व तो राज्यपालांकडे अध्यादेश काढण्यासाठी पाठविला. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून अध्यादेश जारी केला.

तालुक्‍यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीचा श्री संत दामाजी साखर कारखाना राहावा व सभासदांना उसाचा रास्त भाव मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून श्री संत दामाजी कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनेल स्वतंत्ररीत्या लढण्याचे ठरले आहे.

त्या दृष्टीने लवकरच बैठका घेण्याचे ठरले असून कारखान्याची बांधणी करण्याची व सर्वसमावेशक पॅनेल तयार करण्याची तयारी असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, अरुण किल्लेदार,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील व युन्नूस शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवडणूकसंत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
Next Post
सोलापूरात येणार ‘हे’ नवे 23 पोलिस अधिकारी! 33 अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली

सोलापूर ब्रेकिंग! वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीची दखल, 'या' पोलिस स्टेशनचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा