टीम मंगळवेढा टाईम्स।
विधानसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याच्या उद्देशाने पैशाचे वाटप करणाऱ्या तरुणावर ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी रात्री ११:१० वाजण्याच्या सुमारास घडला.
मतदान अवघ्या दोन दिवसावर आले असता, मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेमोरियल शाळेसमोरील गोकूळ नगरात एक तरुण पैसे वाटप करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
प्राप्त माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहचले, तेव्हा एका तरुणाजवळ पिशवी होती. पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटा व नावे लिहिलेले कागद घेऊन तो संशयितरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याच्याकडे असलेली पिशवी तपासली असता आतमध्ये नावे लिहिलेल्या चिठ्ठया आणि पाचशे रुपयांच्या १६० नोटा असे एकूण ८० हजार रुपये आढळून आले.
याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान तो कोणत्यातरी राजकीय पक्षाला मतदान द्या, म्हणून पैसे वाटत असल्याचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील रोकड जप्त केली.
याप्रकरणी पोलिस नाईक अजित माने यांनी फिर्याद दिली आहे. रोहन सुनील सोमा (वय २८ रा. योगेश्वर नगर, जुने विडी घरकुल) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १७०, १७३ सह लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२३(१) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज