टीम मंगळवेढा टाईम्स।
‘तो’ पाच वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करून त्याला शिकवले, तो प्राध्यापक झाला , लाखाच्यावर पगार घेऊ लागला.
मात्र आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. शिवाय विश्वासघात करून तिच्या नावावरील जमीनही विकली.
९५ व्या वर्षी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृध्द आईला मुलाने दरमहा सात हजार रुपये द्यावेत असे आदेश पैठण न्यायालयाचे न्यायाधीश व्ही . एस . वाघ यांनी दिले.
पैठण येथील प्रयागाबाई बाबुराव आनंदकर (९५, रा.रामनगर ) यांनी प्राध्यापक असलेला मुलगा सांभाळ नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी पैठण न्यायालयात अॅड . विजकुमार मुळे , अॅड . सचिन पाटील , अॅड . ए . ए . राका यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता.
याप्रकरणी साक्षपुरावे व झालेल्या सुनावणीतून सव्वा लाख रूपये पगार असलेला मुलगा आईचा सांभाळ करत नसल्याचे अॅड . विजयकुमार मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पती नसताना तीन मुली व एक मुलाचा कष्टाने संभाळ करुन मुलींची लग्ने केली तर मुलाला प्राध्यापक बनवले. मुलासाठी जमीन पाहिजे म्हणून चार एकर जमीन जपून ठेवली.
मुलगा मोठा झाल्यावर सुखाचे दिवस पाहायला मिळतील ही भाबडी आशा बाळगणाऱ्या प्रयागाबाईच्या मुलाने तिचा विश्वासघात करुन जमीन विकली.
आणि तिला वाऱ्यावर सोडले प्रयागबाईला तीन मुलींकडे आसरा घ्यावा लागत आहे अशी भूमिका वकिलांनी न्यायालयासमोर मांडली
मुलगा प्रा.अर्जुन आनंदकर याला पैठण न्यायालयाने खडे बोल सुनावून दरमहा सात हजार रूपये आईच्या उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेश काढले.
संबंधित रक्कम आठ दिवसांच्या आत जमा करावी, असेही आदेशात म्हटले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज