मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
2020 मध्ये संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा धडक दिली आहे. आशियाई देशांमध्ये त्याची एन्ट्री झाली आहे, कोरोना व्हायरसचे रुग्ण आशियातील अनेक देशांमध्ये अचानक वाढू लागले आहेत.

चीन-हाँगकाँग आणि सिंगापूर-थायलंडमध्ये कोरोना व्हायरसने हातपाय पसरले असून फक्त हाँगकाँगमध्येच आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.या देशांमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे पाहूया

आशियाई देशात कोरोनाचे थैमान
– हाँगकाँगमध्ये कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 31 पर्यंत गेली आहे

– सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येत 28 टक्के वाढ झाली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसर्गित रुग्णांची संख्या 14,200 च्या पुढे गेली आहे.

– याच कालावधीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही 30 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
– चीनमध्ये 4 मे पर्यंत रुग्णालयांमधील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

– थायलंडमध्ये एप्रिल 2025 मध्ये झालेल्या सॉन्गक्रान उत्सवानंतर संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत.
आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, भारतालाही असा धोका आहे का? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, भारतात आतापर्यंत केवळ 93 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे.

मात्र कोरोनाचा झपाट्यानं होणारा संसर्ग बघता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचे कारण नसले तरी योग्य खबरदारी घेणं मात्र आवश्यक आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















