mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यातील ‘ही’ गावे कोरोनाचा हॉट स्पॉट; आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2021
in सोलापूर
टेन्शन वाढले! मंगळवेढ्यातील ‘हा’ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे दिसून आल्यावर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जादा रुग्ण आढळलेल्या १३७ हॉट स्पॉट गावांची यादी तयार केली असून, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांवर कडक उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली आहे.

सोलापुरातील संसर्ग कमी झाला आहे. तरीही ग्रामीण भागातील संसर्ग कायम राहिल्याने सोलापूर जिल्हा रेड झोनमध्येच राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सीईओ स्वामी यांनी उपाययोजना आणखीन कडक केल्या आहेत.

आरोग्य विभागाकडून १ मार्च ते २० मे या काळात संसर्ग असलेल्या गावांची यादी मागवून घेतली आहे. यामध्ये महामार्गालगत व शहराजवळ असलेली गावे मोठ्या प्रमाणावर बाधित असल्याचे आढळले आहे. कामानिमित अशा गावांतील लोक सतत स्थलांतर करीत असल्याने संसर्ग कायम राहिल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्या नेतृत्वाखाली दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती २५,५० व १०० रुग्णसंख्या असलेल्या गावांची माहिती संकलित करून रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणार आहे.

अशा होणार उपाययोजना…

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार १३७ गावांपैकी १३७ गावांमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. अक्कलकोट तालुक्यात समर्थनगर व कडबगाव या दोनच गावात जादा रुग्ण आहेत. सतत रुग्ण आढळणाऱ्या गावांतील सर्वांची चाचणी करून पॉझिटिव्ह व संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण करण्यात येत आहे.

तसेच कोरोना उपाययोजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावात शून्य रुग्ण होण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

अशी आहेत हॉट स्पॉट गावे…

मंगळवेढा : मारापूर (११४), पाठकळ (१३३), भोसे (२२६), बोराळे (१९४), दामाजीनगर (२७३), मरवडे (२८१).

उत्तर सोलापूर : बीबीदारफळ (रुग्ण : २१९), नान्नज (१९४), वडाळा (२४५), कळमण (१०८), रानमसले (९५), पाकणी (१३१), कोंडी (१४६), मार्डी (१८६), हिप्परगा (१०१), तिऱ्हे (१०२).

माळशिरस : यशवंतनगर (४६०), माळशिरस शहर (७०४), माळीनगर (२६३), मळेवाडी (२३१), शिंदेवाडी (१०६), निमगाव (१९२), संग्रामनगर (२२६), सदाशिवनगर (१५९), वेळापूर (६३९), नातेपुते (५६२), अकलूज (१४२९), गुरसाळे (१७३), मांडवे (२२७), म्हाळुंग (३२६), लवंग (१७४), श्रीपूर (२५३), धर्मपुरी (१९२), फोंडशिरस (१५५), दहिगाव (४५६), खंडाळी (१९२), संगम (१०१), चाकोरे (१४५), पिंपरी (२३१), पिलीव (१७५), पानीव (१०८), तांदुळवाडी (१४६), मळोली (१०९), मोरोची (२१०), जांबूड (१००), पिसेवाडी (१११), इस्लामपूर (१२५), कारुंडे (१८८).
दक्षिण सोलापूर : मंद्रुप (१५२), होटगी (१५७).

करमाळा : देवळली (१०१), वीट (२४८), करमाळा शहर (५६६)
बार्शी : वैराग (२६९), पांगरी (१४७), गौडगाव (१३५), बावी (१०९).
मोहोळ : आष्टी (१९५), पेनूर (१७३), खंडाळी (१०३), शेटफळ (१०२), अनगर (१०१), मोहोळ शहर (४४८).

माढा : दारफळ (१११), भोसरे (१७५), मानेगाव (१११), निमगाव (१०९), उपळाई बु. (१०७), उपळाई खु. (१२४), मोडनिंब (३४५), बैरागवाडी (१२७), तुळशी (१८९), अरण (१७९), भुताष्टे (११७), परीते (१६२), वरवडे (१०५), पिंपळनेर (१६०), निमगाव टे (१०३), कुर्डू (२२०), टेंभुर्णी (८५५), अकोले खु. (१४५), कन्हेरगाव (१०७), रांझणी (१०९), माढा शहर (२३८).

सांगोला : वाटंबरे (१६७), सांगोला शहर (९१७), य मंगेवाडी (१३६), कडलास (१०७), महुद (१०७), जवळा (१०५).

पंढरपूर : गादेगाव (४७७), उपरी (२०७), कोर्टी (२८३), वाखरी (७१३), तिसंगी (१३१), सोनके (१४७), खेड भाळवणी (१५०), कौठाळी (२७७), शहर (९५६), चळे (१९८), गोपाळपूर (४०७), मुंढेवाडी (१३९), तावशी (१९८), एकलासपूर (१२४), सिद्धेवाडी (१०२), खर्डी (२७८), टाकळी (७३४), बोहाळी (१८३), शेटफळ (१५५), तनाळी (१०३), मगरवाडी (१११), तुंगत (२५५), तारापूर (१२३), सुस्ते (३३५), शेगावदुमाला (१९५), अजनसोड (१२३), देगाव (४१४), रोपळे (२३३), आढीव (१४६), गुरसाळे (२८१), होळे (१२०), खेडभोसे (१५९),

भोसे (४९९), मेंढापूर (११५), पांढरेवाडी (१०१), भानवळी (४६७), जैनवाडी (११२), पळसी (११८), पिराची कुरोली (११२), भंडीशेगाव (२६९), शेळवे (१८६), राझनी (१३४), ओझेवाडी (१७९), सरकोली (२१९), आंबे (१६३), फुलचिंचोळी (१६८), करकंब (७३६).

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
Next Post
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Breaking! भीमा नदीत महिला व 12 वर्षीय लहान मुलगा बुडाले; शोध कार्य सुरू

ताज्या बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..