टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी गावचे सुपुत्र जयराम आलदर यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने मोठी जबाबदारी दिली असून त्यांची मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली.

शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शरदनगर, मल्लेवाडी तालुका मंगळवेढा येथे सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांचा सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम पार पडला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मा.प्राचार्य उत्तमराव लवटे यांनी कामकाज पाहिले.यामध्ये मंगळवेढा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पदी इंग्लिश स्कूल,भोसे या प्रशालेचे मुख्याध्यापक

जयराम आलदर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली.व जिल्हा प्रतिनिधी म्हणून पंढरीनाथ माने यांची निवड करण्यात आली.

यावेळी नियंत्रक समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने,सचिव रंगसिद्ध दसाडे, राज्याचे अध्यक्ष मा.तानाजी माने, सिद्राम खट्टे, रेवणसिद्ध रोडगीकर, विभागीय सचिव राजेंद्र नलवडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक जयराम आलदर यांच्या निवडीबद्दल माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत तसेच संस्थेच्या अकॅडमीक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,अध्यक्ष ॲड.सुजित कदम,उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,सचिव डॉ.प्रियदर्शनी महाडिक,संचालिका प्रा.तेजस्विनी कदम,रामचंद्र नेहरवे,

मित्र परिवारकडून अजित शिंदे, ठेकेदार उमेश मासाळ व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











