टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सहकारी तत्वावर असणारा एकमेव श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अर्थिक समीकरणे प्रस्थापित करणाऱ्या दामाजी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे तालुकाभर वाहण्यास सुरुवात झाली आहे.
या निवडणुकीसाठी आ.आवताडे यांच्या विरोधात तालुक्यातील सर्व पक्षांच्या राजकीय मंडळींनी एकत्र येऊन समविचारी आघाडीची स्थापना करत आ.आवताडे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.
परंंतू या समविचारी आघाडीत आता पर्यंत एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडे यांचे विरोधात उभी राहिली असे दिसत असले तरी अंतर्गत वाद विवाद हे प्रत्येक सभेनंतर दिसत आहेत.
समविचारी आघाडी ही समविचारी राहणार का? हा सभासदांच्या मनामध्ये प्रश्न आहे. दरम्यान, सभासदच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तर दुसरीकडे आ.आवताडे यांनी शेेटवच्या सभासदांपर्यंत चर्चा करून उमेदवार दिलेले आहेत.
माचणूर येथे प्रचाराचा शुभारंभ करून पक्ष आदेशानुसार मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या उमेदवारांनी होम टू होम प्रचार करून प्रचाराची धुरा सांभाळली
व आ.आवताडे यांनी कारखान्याच्या वैभवासाठी केलेले कार्य सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचारात आघाडी घेतली.
तर दुसरीकडे समविचारी आघाडीचा कोणताही उमेदवार आपल्याकडे व्हिजन नसल्यामुळे सभासदांपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत.
तर प्रचाराच्या सभा घेऊन विकासावर न बोलता केवळ आ.आवताडे यांच्यावर टीका करणे हेच प्रचारातून दिसत आहे. तर दुसरीकडे आ.समाधान आवताडे हे आपल्या पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंगळवेढा येथे पोहोचताच त्यांनी सर्व उमेदवारांची त्यांच्या कार्यालयात रात्री नऊ वाजता बैठक घेऊन प्रचाराचा आढावा घेतला.
यावेळी उमेदवारांनी आपल्या गटामध्ये प्रचारादरम्यान सभासदाकडून सुचवलेल्या गोष्टी व अडीअडचणी याची सविस्तर चर्चा केली.
सर्वांचे मत जाणल्यानंतर आ.आवताडे यांनी सर्व उमेदवारांना सर्वांनी एकजुटीने सभासदांपर्यंत पोहोचून आपली बाजू ठामपणे मांडण्यास सांगितले. विजय आपलाच असल्याचा आ.आवताडे यांनी उमेदवारांना आत्मविश्वास दिला.
या बैठकीमध्ये श्री संत दामाजी शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार व पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज