mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सिद्धापूर फेस्टिवलमध्ये विविध क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पुरस्कार वितरण; अभ्यासिका होण्यासाठी आ.आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार; सोमनाथ आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन
सिद्धापूर फेस्टिवलमध्ये विविध क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पुरस्कार वितरण; अभ्यासिका होण्यासाठी आ.आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार; सोमनाथ आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सिद्धापूर येथे आर बी सी ग्रुपच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून अखंडितपणे सिद्धापूर फेस्टिवलच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ उभारले आहे.

या भागातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेसाठी मागणी होत असलेल्या अभ्यासिका उभारण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांनी बोलताना व्यक्त केले.

कै.रामगोंडा बापूराव चौगुले यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त रामगोंडा बापूराव चौगुले बहुउद्देशीय संस्था सिद्धापूर संचलित आर बी सी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने सिद्धापूर फेस्टिवल उत्साहात पार पडले,या फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ अवताडे बोलत होते.

वार्षिक स्नेहसंमेलन व विविध पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती रमेश भांजे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराया चौगुले, मार्केट कमिटीचे संचालक गंगाधर काकणकी,

युवक नेते सचिन चौगुले, दामाजीचे माजी संचालक प्रमोदकुमार म्हमाणे, अरळीचे सरपंच आमगोंडा भांजे, धाऱ्यापा सावळे,बंडू गडदे,योगेश गरंडे, सरपंच रसूल मुलाणी, युवा नेते सागर खबाले यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील ‘या’ गुणी जणांचा सन्मान

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणी जणांचा सन्मान सोहळा म्हणून साहित्य क्षेत्रातून शब्दांकन पुरस्काराने पुष्पा मिसाळ कवियत्री सांगोला, कृषी क्षेत्रातून कृषीरत्न पुरस्काराने श्री विठ्ठल बिराजदार सोनलगी ता जत, शिक्षण क्षेत्रातून आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने श्री रत्नाकर माळी कोल्हापूर,

स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्काराने ज्ञानागण पुरस्कार श्री संगमेश्वर प्रशाला हत्तरसंग दक्षिण सोलापूर, पत्रकारिता क्षेत्रातून जनमित्र पुरस्कार संगमेश जेऊरे सोलापूर, सामाजिक क्षेत्रातून एम के फाउंडेशन सोलापूर संस्थापक महादेव कोगनूरे,

राजकीय क्षेत्रातून उदयोन्मुख राजकीय पुरस्कार श्री विवेक खिलारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा डोंगरगाव, कौटुंबिक संस्कार आदर्श पालक म्हणून सावित्री पाटील बोराळे, वैद्यकीय क्षेत्रातून आरोग्यरत्न पुरस्काराने डॉक्टर प्रीती शिर्के मंगळवेढा यांना पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिद्धापूर फेस्टिवल उत्साहात पार पडण्यासाठी आरबीसी परिवाराचे पदाधिकारी, आरबीसी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षकानी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र लाड यांनी तर प्रस्थाविक सचिन मळगे,शेवटी आभार प्रदर्शन आर बी सी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक गजानन पाटील सरांनी केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिध्दापूर फेस्टिव्हल

संबंधित बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
Next Post
गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! सिध्दापुर नदीपात्रातील स्वयंभू मातृलिंग गणपती अंगारकी चतुर्थीनिमित्ताने दर्शनासाठी खुला

भाविकांनो! सिद्धापूर येथे आजपासून स्वयंभु मातृलिंग गणपती यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची मांदियाळी; जादा बसेसची व्यवस्था

ताज्या बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..