मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यासाठी मी क्लस्टर प्रकल्प मंजूर करीत असून त्यासोबत टेक्निकल सेंटरही देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे आयोजित भव्य कृषी उद्योजकता मेळाव्याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते प्रा.शिवाजीराव सावंत हे होते.
याप्रसंगी अँड.सुजित कदम, उद्योजक पवन महाडिक, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, संचालिका डॉ.मीनाक्षी कदम, माजी सभापती सोमनाथ आवताडे, दिलीप कोल्हे, प्रणव परिचारक, डॉ.सुभाष कदम, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळूंगे, भाजप सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राज्य संघटक दीपक चंदनशिवे, सोलापूर विद्यापीठाचे प्र.कुलगुरू राजेश गादेवार, माऊली हलनवार आदीजन उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी मंगळवेढा परिसरातील युवकांना उद्योजक बनवायचे आहे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तरुणांनी पुढे येऊन उद्योजक बनावे, मंगळवेढा भाग गरिब नाही, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मंगळवेढा येथील लोक साथ देतील, प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी परिसरात सुजलाम सुफलाम होण्यासाठी धडपड सुरू आहे.
मंगळवेढा भागात मला उद्योग सुरु करायचे आहे, यासाठी प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी मला विनंती केली. आमच्या भागात अनेक तरूण बेरोजगार आहेत. त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रियदर्शनी यांची धडपड सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांची इच्छा शक्ती असल्यामुळे सुपूर्ण जगात भारत एक नंबर आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम कौतुकास्पद आहे.
तरुणमहिलांसाठी हजारो उद्योग असून महिलांनी उद्योग करण्यासाठी पुढे आले पाहिजे सर्व काही शक्य असून पुढे येईन केले पाहिजे.
माणसाने कसे जगावे, सुखी जीवन म्हणजे काय, त्यांचे उत्पन्न काय, अमेरिका, ब्रिटन, येथील नागरिकांचे दरडोई उत्पन्न 70 लाख आमच्या भागातील नागरिकांचे फक्त 2 लाख आहे. उत्पन्न वाढण्यासाठी उद्योग हाच पर्याय असून यासाठी सर्वांनी पुढे येईल साथ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काळात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दिला असल्याचे ते म्हणाले.
उद्योग वाढावे यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. अमेरिका महासत्ता झाली त्याचे दरडोई उत्पन्न 56 लाख आहे. राहणीमान उंचावले आहे. आपले ही उंचावेल.
फळ उद्योजक प्रक्रियेसाठी प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी मागणी केली. अनेक छोटे मोठे कारखाने सुरू करावेत, मोदी सरकार उद्योग उभारण्यासाठी सबसिडी देत आहे, याचा फायदा घ्यावा. 1 लाख कोटी रुपये वाटप केले आहेत.
उत्पन्न वाढविण्यासाठी मेहनतीने सिद्ध करा. चायना देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून घरा घरात उद्योग सुरु केले आहेत. महिलांचे बेनटेक्सचे सर्व दागिने चायना येथे प्रत्येक घरात तेथील महिला बनवतात.
कोरोनामध्ये पंतप्रधान मोदी यांनी उद्योग उभारण्यासाठी 31 योजना दिल्या. मोदी सरकारच्या सर्व योजना गरीब जनतेपर्यंत पोहचल्या आहेत. बेरोजगार युवकांनी उद्योजक बनावे. वआत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरजअसल्याचे ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यात मी अनेक वेळा आलेलो असून दुष्काळी भाग म्हणून मंगळवेढा ओळखा जात आहे. ही ओळख पुसण्यासाठी प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी केले सूत्रसंचालन अभिराम सराफ यांनी तर आभार डॉ.मीनाक्षी कदम यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज