mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 13, 2020
in क्राईम, सोलापूर
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

खुनी हल्ला करून जखमी केल्याबद्दल दवाखान्यातील खर्च व झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल या खुनी हल्ला प्रकरणातील जखमी राजकुमार कुंभार, महादेव कुंभार व सुधाकर कुंभार यांनी आरोपी राजकुमार रुद्रप्पा गावडे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) याच्यासह सातजणांविरुद्ध पंढरपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात  २१ लाख ९७ हजार ६१७ रुपये इतकी नुकसान भरपाई मिळण्याबद्दलचा दावा दाखल केला आहे. अशा प्रकारचा दावा दाखल होण्याची पंढरपूर न्यायालयातील ही पहिलीच घटना आहे.

 

मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे शेतजमिनीच्या वादातून १० डिसेंबर २०१७ रोजी राजकुमार  गावडे, कुमार गावडे, संजय कुमार गावडे, रवींद्रकुमार गावडे, गुंडाप्पा उर्फ बंडू आप्पा गावडे, वासुदेव गावडे व रुद्रप्पा गावडे यांनी सकाळी नऊच्या सुमारास राजकुमार कुंभार, महादेव कुंभार व सुधाकर कुंभार यांच्यावर तलवार, काठी, कुऱ्हाड अशा घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात तिघेही गंभीर जखमी झाले होते.

 

एवढेच नव्हे तर त्यांच्या वाहनांना आगी लावून मोठे नुकसान केले होते. गंभीर जखमींना त्वरित सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व तज्ज्ञ डॉक्टरच्या उपचारामुळे या तिघांचे सुदैवाने प्राण वाचले. त्यानंतरही या तिघांनी सांगली येथील दवाखान्यात देखील उपचार घेतले. या उपचारासाठी त्यांना प्रचंड खर्च करावा लागला.

दवाखान्यातील औषधोपचाराचा खर्च, झालेला शारीरिक त्रास व मानसिक मनःस्ताप या सर्व बाबींसाठी राजकुमार कुंभार, महादेव कुंभार व सुधाकर कुंभार यांनी सर्व आरोपींविरूद्ध २१ लाख ९७ हजार ६१७ रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंढरपूरचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दावा दाखल केलेला आहे.

अशा प्रकारचा दावा दाखल होण्याची पंढरपूर  न्यायालयातील पहिलीच घटना आहे.
याप्रकरणी वादी जखमी राजकुमार कुंभार, महादेव कुंभार, सुधाकर कुंभार यांच्यातर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे,ॲड. मनोज मिसाळ, ॲड. विकास मोटे तर प्रतिवादी आरोपीतर्फे ॲड. एस.टी.लवटे हे काम पाहात आहेत.

या खटल्याची पुढील सुनावणी दि.२९ डिसेंबर २०२० रोजी ठेवण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध फौजदारी खटलादेखील पंढरपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Mangalwedha news

संबंधित बातम्या

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आधी तीनही मुलांना विष पाजले; नंतर स्वतः पिऊन पित्याने जीवन संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना; तिघांवर उपचार सुरू

April 3, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ

April 2, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

ताज्या बातम्या

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 3, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा