टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील शिल्पा आप्पासो भोसले (वय.२३) ही विवाहिता स्टोव्हवर चहा करीत असताना भडका उडून गंभीर भाजल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. मृत शिल्पा हिच्या पश्चात पती व तिचा दीड वर्षाचा मुलगा आहे.
चिकमहूद ता.सांगोला येथील आप्पासो नवनाथ भोसले याचे गावात सलूनचे दुकान आहे. काल शनिवारी दुकानला सुट्टी असल्याने पती-पत्नी डाळिंबाला औषधाची फवारणी करीत होते.
दरम्यान शिल्पा सायं ६.३० च्या सुमारास स्टोव्हवर चहा करीत असताना भडका उडाला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या आत्याने घरात धाव घेवून आरडाओरडा केल्याने दीर दत्तात्रय भोसले याने विझविण्याचा प्रयत्न केला.
पती आप्पासो भोसले व दीर दत्तात्रय भोसले यांनी जखमी अवस्थेत तिला सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत मनोज भोसले रा.चिकमहूद खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज