मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील जगदज्योती महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत लवकरच ठोस अशी भूमिका घेऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी सोलापूर विमानतळावर उतरल्यावर मुख्यमंत्री फडणीस यांची भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी भेट घेऊन महात्मा बसवेश्वर त्यासोबतच चोखामेळा महाराज यांच्या स्मारकाबाबत निवेदन दिले व तशा पद्धतीचे सर्व कागदपत्र आजपर्यंत झालेला पाठपुरावा या संदर्भात चर्चा केली.
या चर्चेदरम्यान दोन्ही स्मारक हा अजेंडा वरचा विषय असून त्याबाबत लवकरात लवकर अशी ठोस भूमिका घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस आश्वासन पूर्ण करतील :
दोन्ही स्मारक है मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आग्रहाचे विषय असून त्याकरता ते सकारात्मक आहेत. आज देखील त्यांना स्वागतासाठी भेटलो असताना बसवेश्वर स्मारकांची संपूर्ण फाईल दाखवण्यात आलेली आहे,
यावेळी सदरील स्मारकाबाबत लवकरच निर्णय घेऊ आणि त्याकरता ज्या ज्या तरतुदी कराव्या लागतील त्या करू. असे ठाम आश्वासन त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा हातूनच हे दोन्ही स्मारक होऊ शकतील. आणि त्याकरता ते सकारात्मक देखील आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.
आग्रही भूमिका
यापूर्वी देखील बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेत राष्ट्रीय स्मारक करण्याबाबतचा निर्णय घेतला होता . परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते होऊ शकलं नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज