मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व पांडुरंग साखर कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन विस्तारित गाळप व पोटॅश निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बुधवारी होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी श्रीपूर येथे येणार आहे.-सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर उभारला आहे,
त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कारखान्याने दररोज १० हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
पोटॅश निर्मिती प्रकल्पही सुरू करत आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आज २.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री सार्वजनिक विजयसिंह मोहिते-पाटील, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्र्यय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
त्याशिवाय आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, आ.दिलीप सोपल, आ.नारायण पाटील, उत्तम जानकर, आ.समाधान आवताडे, आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ.राजू खरे, आ. अभिजीत पाटील या आमदारांसह खासदार धैर्यशील मोहिते- पाटील,
खासदार प्रणिती शिंदे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बबनराव शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, राजेंद्र राऊत, सिद्धाराम म्हेत्रे, शहाजीबापू पाटील, रामहरी रुपनवर, दिलीप माने, धनाजी साठे,
दीपक साळुंखे पाटील, संजय शिंदे, राम सातपुते, जयवंतराव जगताप, यशवंत माने, शामलताई बागल, डॉ. राम साळे, दत्तात्रय सावंत हे माजी आमदार व साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सहकार आयुक्त दीपक तावरे आदी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज