टीम मंगळवेढा टाईम्स।
सणराईज पब्लिक स्कूल, शेळवे प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, युवा उद्योजक राजेंद्र फुगारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी आनंद मोरे, विवेक गायकवाड, श्रीकांत माने,नितीन सावंत,मेजर गजानन पवार, शहाजी पाटील, विजय शिंदे तसेच सर्व सणराईज पब्लिक स्कूल शेळवे वर प्रेम करणारे मित्रपरिवार,
पालक परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते,पालकांमधून परफेक्ट कॉम्प्युटर चे सर्वेसर्वा सुधाकर पवार व सनराईज मीडियाचे समाधान भैय्या गाजरे यांनी मनोगत व्यक्त केले व सणराईज परिवारास प्रेरणा दिली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी आपल्या प्रस्ताविकामधून लवकरच निवासी विद्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचे घोषित केले,
तसेच आपल्या प्रशालेच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट केला;युवा उद्योजक राजेंद्र फुगारे यांनी प्रशालेची विद्यार्थ्यांप्रति असलेली आत्मियता काही प्रसंगातून सांगून दिली,तसेच पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले,
शाळेत होणारे सर्व उपक्रम स्तुत्य असतात व त्यातून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालना मिळते आणि म्हणूनच सणराईज पब्लिक स्कूल ही प्रशाला राज्यभरात नावलौकीकास पात्र झाली आहे,
प्रशालेस सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य देण्याचेही आश्वासन युवा उद्योजक राजेंद्र फुगारे यांनी या वेळेस दिले.
कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील विध्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आविष्कार केला, कवायत, संचालन, भाषणे, गाणी, विविध कृती सादर केल्या; युवा नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, अभिजित पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण ही या वेळेस करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड व सौ. दीपाली कुंभार यांनी केले,तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे, संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे व सर्व शिक्षक कर्मचारी परिवार यांनी परिश्रम घेतले.
शेवटी मान्यवरांच्या शुभहस्ते खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज