टीम मंगळवेढा टाईम्स ।
कुर्डुवाडी येथील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर अरुण काकडे याच्याविरुद्ध फिर्यादीस मुदत ठेव व खात्यावरील रकमेपोटी
दिलेला चेक बँकेत जमा केल्यानंतर न वटल्याने माढा कोर्टात कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोर्टाकडून आरोपीला समन्स जारी करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडूवाडी येथील रहिवाशी अतुल सावंत, अजित सावंत व छाया सावंत यांनी अष्टविनायक पतसंस्थेत एकूण २८,१८,००० रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या व छाया सावंत यांचे सेव्हिंग व आर.डी.च्या खात्यात देखील ३,१४,६२० रुपये एवढी रक्कम जमा होती.
सदर मुदत ठेवी सेव्हिंग व आर.डी.चे खात्यावरील १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंतची व्याजासह होणारी रक्कम ६७,३४,५४७ रुपये एवढी रक्कम
फिर्यादी अतुल सावंत याने संस्थेचे चेअरमन पोपट चव्हाण (रा. बारलोणी), संचालक पंडित आवताडे (रा. अष्टविनायक मोबाईल शॉपी, कुडूवाडी) व मॅनेजर अरुण काकडे यांना मागणी केली.
दरम्यान सावंत यांनी माढा कोर्टात अरुण काकडे यांच्याविरुद्ध नि.ई. अॅक्ट कलम १३८ अन्वये एस.टी.सी. केस नंबर ७४०/२०२४ ही अॅड. प्रमोद पलसे व अॅड. विनोदकुमार दरगड यांचेमार्फत फिर्याद दाखल केली.
माढा न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश वाय.एस.आखरे यांनी फिर्यादीने दाखल केलेली कागदपत्रे व पुरावे पाहून अरुण काकडे यांनी नि.ई. अॅक्ट कलम १३८ अन्वये गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करून घेऊन त्याला आरोपी समन्स काढले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज