टीम मंगळवेढा टाइम्स ।
मागील भांडणाचा रोष मनात धरून एकाने कारमधून दुचाकीचा पाठलाग करून जिवंत सोडणार नाही, म्हणत लोखंडी टॉमी डोक्यात मारून प्राथमिक शिक्षकाचे डोके फोडले.
ही घटना रविवारी सायंकाळी ४:३०च्या सुमारास सांगोला-जत रोडवर माण नदी पुलानजीक घडली. याबाबत ज्ञानेश्वर सुखदेव टोणे (रा. शिवाजीनगर, कडलास रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी हिंमत पांडुरंग गळवे (रा.वाळेखिंडी, ता. जत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर टोणे हे प्राथमिक शिक्षक असून, आरोपीसोबत यापूर्वी किरकोळ वाद झाल्याने त्यांनी जत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तो फिर्यादीवर चिडून होता.
दरम्यान, १२ मेरोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास टोणे हे मूळ गाव वाळेखिंडी येथून दुचाकीवरून जतकडून सांगोला येथील घराकडे येत होते.
माण नदी पुलावर आले असता पाठीमागून कारमधून आरोपी हा त्यांच्या दुचाकीच्या मागे जोरजोराने रेस करत होता. फिर्यादीने त्यास माझ्या गाडीच्या पाठीमागे येऊन कार रेस का करतो? असे विचारले असता आरोपीने फिर्यादीस तू मागील भांडणात वाचला आहे,
आता तुला सोडत नाही, म्हणत शिवीगाळ केली. कारमधून लोखंडी टॉमी त्यांच्या डोक्यात मारली. रक्त येत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज