टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरकारच्या मंत्रीमंडळ स्थापणेचा मुहूर्त अखेर निघाला असून, आज अनेकांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील अनेक दग्गिजांना फोनवरून निमंत्रण मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
मात्र सोलापूर जिल्ह्यातून संभाव्य मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून समावेशाची शक्यता असणारे भाजपचे आमदार समाधान आवताडे, आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख यांना पक्षाकडून अद्याप कोणताही संदेश न आल्याने ते सध्या मतदारसंघातच आहेत.
तर जिल्ह्यातील भाजपचे अन्य आमदारही आपापल्या मतदारसंघातच आहेत. मात्र आ.रणजितसिंह मोहिते-पाटील हे अकलूजवरून मुंबईकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.
शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार/ की जिल्ह्याच्या पदरात मंत्रिपदाचे मापटे दुसऱ्या टप्प्याच्या वस्तिारात पडणार याबद्दल सध्या तरी सस्पेन्स कायम आहे.
अगोदरच मंत्रिमंडळ स्थापनेस झालेला उशीर, त्यात पहल्यिा टप्प्यात सोलापूरला संधी मिळण्याची शक्यता कमी. या कारणाने सत्ता येऊनही मंत्रीपदं नसल्याने बापू, मालक, दादा समर्थकांची अवस्था ‘इंतेहा हो गई इंतजार की’ अशी झाली आहे.
शिंदे -फडणवीस सरकारमधील संभाव्य मंत्री म्हणून आमदार समाधान आवताडे, आ.विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख,आ. रणजितसिंह मोहिते -पाटील या नावांची चर्चा आहे.
मात्र चर्चित नावातील कोणालाही भाजपकडून मंत्रिमंडळ वस्तिाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईला येण्याचे ‘आवतण’ नसल्याने मंत्रिमंडळ स्थापनेतच सोलापूर जिल्ह्याचा भ्रमनिरास झाला आहे.
दरम्यान, शिंदे गटातून अजून कोणालाच बोलवणे पाठवण्यिात आले नाही. त्यामुळे ‘काय झाडी, काय डोंगार’ या डॉयलॉगने राज्यभर फेमस झालेले आमदार शहाजीबापू पाटील अजूनतरी प्रतक्षिेत आहेत.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज