टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराजवळील बायपास रस्याची अक्षरः शा चाळण झाल्याने आपघाताला आमंत्रण मिळत असून हा रस्ता तात्काळ दूरूस्त करावा अशी मागणी
संत दामाजी नगर ग्रामपंचायत सदस्य आण्णासो आसबे यांनी राष्ट्रीय महामार्ग आधिकाऱ्यांकडे करून न केल्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मंगळवेढा शहराजवळील पंढरपूर रोड ते सोलापूर रोड कडे जाणाऱ्या बाह्यमार्ग रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. चार ते पाच गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
सदरच्या रस्त्यावरून जुना ढवळस रोड, धर्मगाव रोड, दामाजी कारखाना रोड येथील वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
अवजड वाहतुकीसाठी ह्या बाह्यवळण मार्गाचा वापर होत असून सदरचा रस्ता नादुरुस्त आहे, रस्ता खराब असल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत.
तसेच अनेक जण जखमी झाले आहेत असे असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग रस्त्याची कसलीही दुरुस्ती करीत नाही.
हा सदरचा बाह्यवळण मार्गे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा न केल्यास दिनांक २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशीपासून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या
कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा संत दामाजीनगर ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब आसबे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय सोलापूरचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज