टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा बसस्थानकावर आगारातील पंढरपूरकडे जाणाऱ्या स्टँडजवळ सदर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला आपल्या ताब्यातील एसटी बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून प्रवाशाच्या अंगावर घालून डावा हात व
दोन्ही पायास गंभीर दुखापत करुन दोन्ही पायाचे हाड फ्रैक्चर केल्याप्रकरणी मंगळवेढा आगाराचे एसटी चालक अब्बास लतिफशा मकानदार (रा. बठाण) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील जखमी फिर्यादी हरी धानप्पा केंगार (वय ६५ रा. मरवडे) हे दि.१९ जून रोजी सकाळी १० वाजता एसटी बसने मंगळवेढ्यात दाखला घेणेकामी शेतकी ऑफिसला आले होते.
दुपारी १२.३० वाजता मंगळवेढा फिर्यादी हे थांबले असता पंढरपूरहून मंगळवेढा एसटी आगारात येणारी एम.एच.१४ बी.टी.४४२९ चे चालक तथा आरोपी अब्बास मकानदार यांनी एसटी आगारात घेत असताना जोरात वळविल्याने फिर्यादीच्या अंगावर एसटी गेली.
त्यावेळी फिर्यादीचा डावा हात व दोन्ही पायास जबर जखम झाल्याने रक्तस्त्राव होवू लागला त्यामुळे फिर्यादी बेशुध्द पडले, तद्नंतर सदर एसटी चालक व कंडक्टर यांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.
शुध्दीवर आल्यानंतर फिर्यादीने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज