टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुमच्याच बँकेत सोनेतारण करणार असून सोनाराकडून सोने सोडवून आणण्यासाठी तात्पुरते तीन लाख रुपये उसने द्या असे म्हणून दोघांनी अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्याची फसवणूक केली.
ही घटना दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.४० च्या दरम्यान चौंडेश्वरी मंदिरासमोर कोष्टी गल्ली, सांगोला येथे घडली असून हर्षद पाटील दत्तनगर व आणखी एक इसम असे दोघांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, किरण बाळासो भोसले (रा.वाकी शिवणे, ता.सांगोला) हे अॅक्सिस बँकेमध्ये सोने तारण कन्सल्टिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
याच बँकेत सचिन तात्यासो रोकडे रा.बार्डी, ता. पंढरपूर हे बीएलओ म्हणून काम करतात. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रोकडे हे हर्षद पाटील (दत्तनगर सांगोला) व आणखी एका इसमास घेऊन यांना सोनेतारण करायचे आहे.
त्यांना माहिती द्या असे म्हणून सोनेतारण कन्सल्टिंग ऑफिसर भोसले यांचेकडे घेवून आले. यावेळी हर्षद पाटील याने भोसले यांना विश्वासात घेवून मी द्रोपदी ज्वेलर्स चौंडेश्वरी देवीचे मंदिराचे समोर, सांगोला येथे माझे स्वतःचे आठ तोळे सोने तारण ठेवले असून
ते मला तेथून सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोने तारण कर्ज प्रकरण करायचे असे सांगून विश्वासात घेतले.
मला तीन लाख अॅडजस्ट करून दिल्यास मी द्रोपदी ज्वेलर्स येथे तारण म्हणून ठेवलेले माझे सोने सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोनतारण कर्ज प्रकरण करतो असे सांगितले.
त्यावेळी भोसले यांनी स्वतः जवळचे दिड लाख रूपये व बीएलओ सचिन रोकडे यांचेकडून दीड लाख रूपये घेऊन हर्षल पाटील यास देत सोबत एक इसम त्यांचे मोटर सायकलीवर व भोसले स्वतः त्यांचे मोटर सायकलवर असे मिळून सोने द्रोपती ज्वेलर्स येथे सकाळी ११.४० वाजता गेले.
दरम्यान हर्षद पाटील याने भोसले यांना तुम्हाला दुकानदार ओळखेल पैसे माझ्याकडे द्या मी लगेच सोने सोडवून घेवून येते असे सांगून दोघेजण दुकानात गेले. त्यानंतर दोनच मिनिटात दोघेही दुकानाबाहेर आले व मोटरसाकल वरती बसून वेगात मणेरी चौकाचे दिशेने पळून गेले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज