mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अरे वा..! धनश्रीच्या दोन्ही संस्थेला ‘इतक्या’ कोटींचा नफा, एक हजार कोटीचा टप्पा केला पार; सभासदांना लाभांशही केला जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 1, 2022
in मंगळवेढा, शैक्षणिक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकांमध्ये विश्वास निर्माण करून ठेवी मिळविणे, हे खऱ्या अर्थाने धनश्रीच्या दोन्ही संस्थेचे यश आहे. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री परिवाराने वाटचाल केली आहे.

धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टी स्टेटच्या प्रगतीत संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचे मोलाचे योगदान असून आपण सर्वांनी आजपर्यंत दाखविलेला विश्वासामुळे धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टी दोन्ही संस्थेने एक हजार कोटीचा टप्पा पार केला आहे. असे प्रतिपादन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

धनश्री महिला पतसंस्थेची 26 वी धनश्री मल्टीस्टेटची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी 11.00 वा. वीरशैव मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली. याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे, व्हा. चेअरमन प्रभावती कनशेट्टी, धनश्री मल्टिस्टेटचे व्हा.चेअरमन युवराज गडदे, संत कुर्मदास कारखान्याचे चेअरमन माजी आमदार धनाजी साठे,

संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा तानाजी खरात, सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव,

सांगोला सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, उद्योजक उध्दव बागल, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, दयानंद सोनगे, मारुती  सावंत, यादाप्पा माळी,

डॉ. एम.आर टकले, शिवाजीराव पवार, ज्ञानदेव जावीर, किसन सावंजी, रामचंद्र बंडगर, राजाराम सावंत, गणेश जाधव, सतिश दत्तू, युवा उद्योजक सुयोग गायकवाड, मनिषा कुंभार, सुवर्णा पवार, संगीता सावंजी, कल्पना गडदे,

स्नेहल सावंत, गोकुळा जावीर, सुनीता नागणे, सुरेखा कलुबर्मे, यमुना शिंदे, शकुंतला लिगाडे, अविनाश चव्हाण,  उमाकांत कनशेट्टी, प्रभाकर कलुबर्मे, दत्तात्रय नागणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव व मल्टीस्टेटचा दशकपुर्ती सोहळा लवकरच साजरा करणार आहोत.

या दोन्ही संस्थेचे एक हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारची मंगळवेढा तालुक्यातील एक हजार कोटी ठेवीची संस्था म्हणून सर्व ठेवीदार,खातेदार, सल्लागार, संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून एकमेव ठरली आहे.

सभासदांना 10 व 11 टक्के लाभांश जाहिर

चालू आर्थिक वर्षात धनश्री महिला पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश व धनश्री मल्टीस्टेटच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहिर केला आहे.

अत्यंत कमी कालावधीमध्ये या दोन्ही संस्थेने उत्तुंग अशी घोडदौड करत  यशाच्या टप्प्याकडे ही संस्था वाटचाल करीत आहे. समाजाचे एक ऋण म्हणून यापुढेही धनश्री परिवारात काम करत राहू.

प्रा.शोभाताई काळुंगे म्हणल्या, धनश्री परिवारातील दोन्ही संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळा बरोबरच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व प्रामुख्याने अत्यंत तत्पर विनम्रपणे सर्वांना सेवा देणारे कार्यक्षम कर्मचारीवृंद यांचे मोलाचे योगदान आहे.

स्पर्धेच्या युगात देखील संस्थेचे कर्मचारी सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकचे कामकाज करत आहेत. आजच्या काळात पात्र आणि वेळेवर कर्जाची फेड करणाऱ्या कर्जदारांची बँकेला नितांत गरज आहे.

धनश्री पतसंस्थेला 2021- 2022 आर्थिक वर्षात सर्व तरतुदी करून 2 कोटी 13 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे.

तसेच धनश्री मल्टिस्टेटला 2021- 2022 आर्थिक वर्षात सर्व तरतुदी करून 2 कोटी 76 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे.

धनश्री पतसंस्थाच्या 26 वर्षात 14 शाखांपैकी 10 शाखेने स्वमालकीच्या इमारती उभ्या केल्या आहेत. तर धनश्री मल्टिस्टेटने 11 वर्षात 33 शाखांपैकी 13 शाखांसाठी स्वमालकीच्या जागा खरेदी केल्या आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

धनश्री महिला पतसंस्थेला 2 कोटी 13 लाख इतका नफा

यावेळी धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित या वर्षी संस्थेने सभासदांना 11 टक्के लाभांश देत असून 31 मार्च 2022 अखेर संस्थेच्या 463 कोटी 47 लाख ठेवी आहेत.

त्यामध्ये गतवर्षापेक्षा 69 कोटी 71 लाख इतकी वाढ झाली आहे. तसेच आर्थिक वर्षात 2 कोटी 13 लाख इतका नफा झाला आहे त्याचबरोबर 2021-22 चे अंदाजपत्रकास मंजूरी घेतली.

धनश्री मल्टीस्टेटला 2 कोटी 76 लाख नफा

धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित संस्थेने 10 टक्के याप्रमाणे लाभांश देत असून 31 मार्च 2022 अखेर संस्थेच्या 555 कोटी 46 लाख ठेवी आहेत.त्यामध्ये गतवर्षापेक्षा 146 कोटी 49 लाख ठेवीची वाढ झाली आहे.

तसेच आर्थिक वर्षात 2 कोटी 76 लाख इतका नफा झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी 2021-22 चे अंदाज पत्रकास मंजूरी घेतली.

उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान

याप्रसंगी धनश्री महिला पतसंस्थेच्या व धनश्री मल्टिस्टेटच्या सर्व शाखेतील उत्कृष्ट खातेदार यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत व सलगर शाखेचे शाखाधिकारी राजू गवळी व धनश्री मल्टिस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे व रड्डे शाखेचे शाखाधिकारी किरण मेहेरकर यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर दोन्ही संस्थेच्या प्रत्येकी तीन शाखेचा उत्कृष्ट शाखा म्हणून गौरव करण्यात आला. तसेच वर्षभर सर्वात जास्त पिग्मी संकलन करणाऱ्या दोन्ही संस्थेतील प्रत्येकी तीन पिग्मी एजंटचा गुणगौरव याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच धनश्री महिला पतसंस्थेचे व मल्टिस्टेटचे सर्व शाखाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन नितीन कदम व राणी उन्हाळे यांनी केले तर आभार माऊली जाधव यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री मल्टिस्टेट बँक मंगळवेढा

संबंधित बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
Next Post
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

खुशखबर! राज्यात साडेसात हजार पोलिस कर्मचाऱ्यांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ताज्या बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..