मंगळवेढा टाईम्स न्युज।
सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्व असलेल्या अनगरच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता.

अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटेंनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला.
या वेळी पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. या व्हिडिओने राज्यात खळबळ उडाली.

अजित पवार म्हणत रागाने बोट दाखवित, दंड थोपटले. एकप्रकारे अजित पवारांना आव्हानाच दिले आहे.
अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आज बाद झाल्यावर भाजपच्या राजन पाटील समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. राजन पाटलांच्या मुलाने थेट अजित पवारांना चॅलेंज दिले. ” अजित पवार कोणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाही” असे म्हटले.

अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटलांनी जोरदार जल्लोष केला.

अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असे थेट बाळराजे पाटील यांनी चॅलेंज दिल्याचे दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भयानक व्हायरल झाला. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी टीका केली.

उज्वला थिटे कोर्टात जाणार –
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला थिटे आज सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. अनगर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज सूचकाची सही नसल्यामुळे बाद केला होता.
उज्वला थिटे आज छाननी अर्ज बाद झाल्यानंतर या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात अर्ज भरला होता.
उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











