mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ‘या’ दोन बड्या नेत्यांची गुप्त बैठक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ‘या’ दोन बड्या नेत्यांची गुप्त बैठक

 

टीम मंगळवेढा टाईम्स । मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात कधीही न पाहिलेला सत्तासंघर्ष दिसून आला. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली होती.

या सर्व घडामोडीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती.

दरम्यान, आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. याबाबत टीव्ही ९ ने बातमी दिली आहे. 

ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नाही. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता, सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल संजय राऊतांनी भाजपावर आरोप केले होते.


 

या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडण्यात येत होते, मात्र आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणाशी माझा संबंध नाही असं पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए…अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है” 


त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे या प्रश्न आहे. मात्र आजच्या बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.

शिवसेना आणि भाजपा पुन्हा सत्तेसाठी एकत्र येणार?

शिवसेनेने आपल्या मूळ विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे विराजमान झाले, मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, त्यानंतर शिवसेनेने भाजपावरही निशाणा साधला. मात्र या भेटीनंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

दोन विरोधी पक्षांचे नेते कधी एका कार्यक्रमात एकत्र येणार असतील तर त्यांची भेट होते, अशाप्रकारे कोणतीही गुप्त बैठक होऊ शकत नाही, लपवाछपवी करण्याचं कारण नाही, संजय राऊत यांच्यासोबत बैठक झाली हे आम्हाला काहीही माहिती नाही,


 

भाजपा-शिवसेना सध्या एकत्र येतील असं वाटत नाही, दोन्ही पक्ष राजकीय मार्गातून खूप दूर झाल्याचं दिसतंय, पण राजकारणात काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊ शकते, तर शिवसेना-भाजपा एकत्र येऊ शकतील, 


पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीत शिवसेना-भाजपा जवळ येईल असं वाटत नाही असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.

BJP-Shiv Sena to reunite?  2 hour secret meeting between Devendra Fadnavis and Sanjay Raut

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 17, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

February 6, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

भोसे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग; भैरवनाथ शुगरमध्ये आज विचारविनिमय बैठक, भोसे जिल्हा परिषद गटासह मंगळवेढा तालुक्याचे लक्ष

February 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कोण कोणामध्ये होणार थेट लढत? संपूर्ण यादी बघा…

January 27, 2026
Next Post
दिलासा! मंगळवेढा तालुक्यात आज एकाच दिवशी ‘एवढे’ जण कोरोनामुक्त; दहा नवे कोरोनाबाधित

दिलासा! मंगळवेढा तालुक्यात आज एकाच दिवशी 'एवढे' जण कोरोनामुक्त; दहा नवे कोरोनाबाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा