टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे.
या जागेवर सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी खासदार आहेत. जयसिद्धेश्वर स्वामींचं यावेळी तिकीट कापलं गेलं आहे. राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपकडून याआधी 20 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
त्यामुळे भाजप महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. महायुतीचं जागावाटपावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडल्यानंतर भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
कोण आहेत राम सातपुते?
राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कामास सुरुवात केली. त्यांनी पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभाविपमध्ये काम करताना विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपले आक्रमक रूप दाखवले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा पराभव करत राम सातपुते थेट विधानसभेत पोहोचले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज