मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांत आता राष्ट्रगीतानंतर राज्यगीतगाणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे.
पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.
मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.
उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी शालेय शिक्षण विभाग घेणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांची जी काही तपासणी व्हायची ती औपचारिकरित्या व्हायची.
मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक विद्यार्थ्यांची तपासणी करणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देणार आहे. हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज