mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याचा भूमिपुत्र आमदार झाला; भालकेंचा पराभव करत समाधान आवताडेंनी बाजी मारली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 2, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
Breaking! समाधान आवताडेंच्या घराबाहेर समर्थकांचा विजयी जल्लोष; भाजपाने उधळळा गुलला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या आणि अत्यंत चुरशीने झालेल्या पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3733 मतांनी पराभव करत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे.

गेली अकरा वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली ताकद या निवडणुकीत लावली होती.

पण फडणवीस यांनी आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्या माध्यमातून या निवडणुकीत अजित पवारांवर मात केली आहे. दरम्यान, आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली संपूर्ण ताकद आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केल्यानेच हे शक्य झाले आहे.

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक लागली होती. त्यात भाजपने समाधान आवताडे यांना, तर राष्ट्रवादीने भारतनानांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. त्यात आवताडे यांनी भालके यांचा पराभव केला आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आवताडे यांनी मताधिक्य घेतले होते. त्यात फेरीनिहाय कमी जास्त पणा होत होता. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत भगिरथ भालके यांना आवताडे यांचे मताधिक्क्य गाठता आले नाही. मताधिक्य कमी जास्त होत असले आवताडे यांनी 3733 मतांचे अधिक्य घेतही निवडणूक जिंकली.

या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर यांच्यासह दोन डझन आमदार आवताडे यांच्यासाठी मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार यांनी भालके यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. पण खरा सामना हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच रंगला होता.

आमदार प्रशांत परिचारकांचा पाठिंबा ठरला निर्णायक

गेल्या दोन निवडणुकीत भाजपकडून परिचारक कुटुंबील सदस्याने निवडणूक लढवली होती. त्यात एकदा आमदार प्रशांत परिचारक, मागच्या २०१९च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दुसरीकडे समाधान आवताडे हे अपक्ष लढले होते. या निवडणुकांमध्ये त्यांचा सामना हा आमदार भारत भालके यांच्याशी झाला होता. या निवडणुकांमध्ये आवताडे आणि परिचारक यांची ताकद विभागली होती. त्याचा अचूक फायदा उवठत भालके यांनी निवडणुका जिंकल्या हेात्या. मात्र, यावेळी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आवताडे आणि परिचारक यांची मुंबईत बैठक घेत दोघांमध्ये समेट घडविला. त्यात परिचारकांनी आपली संपूर्ण ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी केली. दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी पंढरपूर ताक्यातून निसटते का होईना पण आवताडे यांना मताधिक्य मिळवून दिले.

आमदार संजय शिंदेंना चपराक

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाखरी येथील सभेत आमदार संजय शिंदे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. समाधान आतवाडे यांना समाजवून सांगितले, पण ते काही ऐकनात. प्रशांतमालकांनी मला पाठिंबा दिला आहे. पण त्यांना कोठे माहित आहे की आमचे आणि प्रशांतमालकांचे काय ठरलं आहे ते. आवताडे यांना मतमोजणीनंतरच ते समजेल, असे व्यक्तव्य केले होते. त्यावर परिचारकांनी पलटवार करत संजय शिंदे यांनी ठरलेलं आतापर्यंत कधी पाळलं आहे, असा आरोप केला होता. मात्र, या सर्व घडामोडीत परिचारक यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून समाधान आवातडे यांना निवडणून आणून संजय शिंदे यांना चपराक लगावल्याचे बोलले जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदारसमाधान आवताडे

संबंधित बातम्या

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा आज मंगळवेढा शाखेचा दुसरा वर्धापनदिन सोहळा; 100 टक्के वसुली, लेखापरीक्षकांनी दिला ‘अ’ वर्गाचा दर्जा; कमीत कमी वेळेत सोनेतारण कर्ज 80 हजार प्रति तोळा

August 28, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळ! मंदिराच्या दानपेटीतील पाच हजार रुपये लंपास, पतसंस्थेचे शटर उचकटुन उघडण्याचा प्रयत्न; मंगळवेढा तालुक्यातील घटना

August 27, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 27, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
Next Post

जी जागा बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची 'हे' कारणं; वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

करारा जवाब मिलेगा! भारत सरकारनं आखली मोठी योजना; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा सामना करण्यासाठी खेळी

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा आज मंगळवेढा शाखेचा दुसरा वर्धापनदिन सोहळा; 100 टक्के वसुली, लेखापरीक्षकांनी दिला ‘अ’ वर्गाचा दर्जा; कमीत कमी वेळेत सोनेतारण कर्ज 80 हजार प्रति तोळा

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी, ‘या’ अटी-शर्ती पाळाव्या लागणार; नियम नेमके काय?

August 27, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळ! मंदिराच्या दानपेटीतील पाच हजार रुपये लंपास, पतसंस्थेचे शटर उचकटुन उघडण्याचा प्रयत्न; मंगळवेढा तालुक्यातील घटना

August 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..