मंगळवेढा-पंढरपूर येथील नागरिकांच्या मनावर आधी राज्य केलेल्या लोक नेते आ.भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवेढा येथील दामाजी चौकात शोकाकुल वातावरणात अलोट असा जनसागर लोटला होता.
आमदार भारत भालके यांचे २७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव शरीर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३५ वाजता पुणे येथून सरकोली (ता. पंढरपूर) मार्गस्थ करण्यात आले.
दरम्यान टेंभुर्णी मार्गे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानावर (गुरसाळे, ता. पंढरपूर) व पंढरपूर शहरातील शिव तीर्थावर भालकेंची पार्थिव असलेली रुग्णवाहिका आणण्यात आली.
यावेळी मंगळवेढ्यातील नागरिकांनी आ. भालके यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर भालके यांचे पार्थिव मंगळवेढा येथील दामाजी कारखाना रोड मार्गावरून सरकोलीकडे मार्गस्थ झाले आहे.
दुपारी १:३० च्या सुमारास सरकोली येथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी ठेवण्यात येणार आहे. सरकोली येथेच त्यांच्यावरच सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
यांची राहणार उपस्थिती
आ. भारत भालके यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील याच बरोबर शिवसेनेचे मंत्री व आमदार येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज