टीम मंगळवेढा टाईम्स ।
भैरवनाथ शुगर लवंगी कारखान्याने ५ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले असून इतर कारखान्यापेक्षा आमचा कारखाना शेतकरी बांधवांना सर्वंत्तोम दर देणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा बॉयलर पूजन व १० वा गळीत हंगाम श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजी काळुंगे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत,
व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत व पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या शुभ हस्ते बॉयलर पूजन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीस शिवाजी कृष्णा माने सेवानिवृत्त आरटीओ ऑफिसर यांच्या हस्ते ऊस वजन काटा पूजन व ऊसाने भरलेल्या वाहनांचे विधीवत पूजन शाम गोगाव यांच्या हस्ते करण्यात आले.
सत्यनारायण पुजा सागर खिलारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रज्ञा यांचे शुभहस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे वेळी चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील 9 वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत. इतर कारखान्याबरोबर शेतकऱ्यांना सर्वंत्तोम दर दिला जाणार आहे.
तसेच या वर्षी ऊसाची क्षेत्र कमी प्रमाणात उपलब्ध असुन नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणण्यात येईल. त्यामुळे शेतकर्यांनी काळजी करू नये. आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले.
कारखान्याचे संस्थापक आरोग्य मंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कारखान्याचे ५ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांनी यावेळी दिले.
यावेळी दामाजी संचालक बसवराज पाटील, पोलिस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक रणजीत माने, बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष अशोक चौंडे, शिवसेना बागल, श्रीपती माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, समाधान जाधव, शाम गोगाव, जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, मुख्यशेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे,
चीफ अकौंटंट देवानंद पासले, एच आर मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी मॅनेजर माने-देशमुख जी.एस , केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, इलेक्ट्रिक इंजिनीअर राजाराम कोरे, स्टोअर किपर केदार साबणे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज