टीम मंगळवेढा टाईम्स ।
क्रिकेट सामन्याचा निर्णय चुकीचा दिल्याचा राग मनात धरुन एका २४ वर्षीय तरुणास शिवीगाळी दमदाटी करुन त्याच्या खिशातील हजार रुपये काढून घेवून हातातील कडे
डोकीत कानाच्या पाठीमागील बाजूस मारुन जखमी केल्याप्रकरणी आकाश शंकर जाधव, संकेत शहाजी पवार, अजय अरुण माळी (रा. डोंगरगाव) या तिघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा जखमी विक्रम मोरे (रा.खोमनाळ) हे दि.२२ रोजी रात्री ९ वाजता मंगळवेढ्यातील समर्थ हॉस्पिटल समोर औषधोपचार करण्याकरिता फिर्यादी व त्याचा मित्र युवराज सिध्देश्वर कोळी,
प्रभू सौदागर इंगळे यांच्यासह पेशंटची गर्दी असल्याने दवाखान्यासमोर रात्री ९.१५ वाजता थांबले होते.
यावेळी वरील आरोपींनी मोटर सायकलवर येवून मागे दोन महिन्यापुर्वी खोमनाळ येथे क्रिकेटचे सामने चालू असताना आमचे विरोधात चुकीचा निर्णय का दिला असे म्हणून प्रभू इंगळे यास शिवीगाळी, दमदाटी करुन
आरोपींनी त्याच्या खिशातील हजार रुपये काढून घेतले असताना भांडण सोडविताना आरोपींनी हातातील कडे
फिर्यादीच्या डोक्यात उजव्या बाजूला कानाच्या पाठीमागे मारुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याचा अधिक तपास पोलीस नाईक ईश्वर दुधाळ हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज