टीम मंगळवेढा टाईम्स ।
अंगणात केस का टाकले म्हणून जाब विचारला असता माय-लेकांनी शिवीगाळ करत पाइपाने सासू सुनेला बदडून काढले. सासूला ढकलून दिल्यामुळे तिचा डावा हात फ्रैक्चर झाला,
तर सुनेच्या कानशिलात लगावली आणि भांडणात सुनेची सोनसाखळी पडून गहाळ झाली. ही घटना १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास यलमर मंगेवाडी (ता.सांगोला) गावात घडली.
याबाबत विमल प्रल्हाद कंडरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुरेखा विजय गुरव व जीवन विजय गुरव (रा.मंगेवाडी, ता.सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विमल कंडरे यांच्या घरासमोरच सुरेखा विजय गुरव कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरून भांडणं होतात.
दरम्यान, १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विमल या घरासमोर झाडलोट करीत असताना घरासमोर पाण्याच्या खड्यात व खिडकीत महिलेचे केस दिसून आले.
त्यांनी सुरेखाला जाब विचारला असता सुरेखा व तिचा मुलगा जीवन यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी विमल मोठमोठ्याने ओरडल्याने कल्पना सोलशे, द्वारका येल्पले व सून काजल कंडरे यांनी त्यांचे भांडण सोडवले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज