mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतांच्या विचाराचा प्रसार! पंढरीत रंगणार संत नाटकांचा आविष्कार; श्री सदानंद महाराज मंडळाच्यावतीने मोफत आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 26, 2023
in मनोरंजन, सोलापूर

पंढरपूर : राजेंद्र फुगारे ! मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क

विज्ञानाने प्रगती केली परंतु त्या बरोबरच समाजामध्ये धार्मिक तेढ, आंतंकवाद, व्देष, हिंसाचार, नैतिक अध:पतन होत असून यावर संतांच्या विचाराचा प्रचार व प्रसार हाच एकमेव उपाय आहे.

हा उद्दात्त हेतू घेऊनच कार्य करणाऱ्या बालयोगी श्री सदानंद महाराज नाट्य मंडळाच्या वतीने पंढरपूर येथे दि. ५ ते ८ ऑक्टोबर या दरम्यान चार संतांच्या नाटकांचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

संत तनपुरे महाराज मठात गुरूवार ५ ते रविवार ८ रोजी रात्री आठ वाजता सदर नाटकं होणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी संत तनपुरे महाराज मठात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यास नाटकाचे लेखक बालयोगी सदानंद महाराज, महंत मोहनदास महाराज, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, नाटकाचे निर्माते मनोज राऊत, संत साहित्य अभ्यासक प्र.दी. निकते,

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, अॅड. आशितोष बडवे, विश्वनाथ वारिंगे, नाट्य मंडळाचे विश्वस्त संजय भंडारी आदी उपस्थित होते.

यामध्ये गुरूवारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर माउली, शुक्रवारी संत नामदेव यांच्यावर विठु नामयाचा, शनिवारी संत चोखामेळा यांच्यावरील चोखा विठुचा तर रविवारी संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्यावरील अमृतगाथा नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

ही सर्व नाटके मोफत असून यास तरुणांनी उपस्थित रहावे यासाठी विविध शाळा, महाविद्यालयात आयोजक भेट घेऊन आवाहन करणार आहेत.

पालघर जिल्ह्यात सदानंद महाराज यांचे सामाजिक कार्य असून या बरोबरच संत विचाराचा ते प्रसार करतात. संताची समता, बंधुता ही शिकवण समाजातील सर्वस्तरामध्ये पोहचविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

यासाठी त्यांनी महाराष्ट्रासह काशी, हरिव्दार, व्दारका, वृंदावन, जगन्नाथ पुरी आदींसह परदेशात देखील संत ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा याचे सप्ताह भरविले होते. या ठिकाणी त्यांनी सदर संतांची नाटके हिंदी मध्ये सादर करून संतांचा व पंढरीचा महिमा पोहचविला आहे. पंढरीतील संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे कार्य देखील जगा समोर येण्यासाठी प्रथमच अमृतगाथा हे नाटक सादर केले जाणार आहे.

सदर नाटकांचे दिग्दर्शन मुंबई येथील उपेंद्र दाते यांनी केले असून विविध ४० हून अधिक कलाकार हे संगीत नाटक सादर करणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूर

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026
मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

October 19, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
Next Post
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

धनगर आरक्षण आंदोलन! सीईओ कार्यालय तोडफोड प्रकरणी मंगळवेढ्यातील 'या' दोघांना जामीन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 28, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 28, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 28, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! ​आधी सोन्याचा खरा मणी दिला, मग मंगळवेढ्यात बोलावून २ लाखांना घातला गंडा; भामट्यांची नवी शक्कल उघड

October 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

३९ गावांच्या पाण्याचा जीव टांगणीला लावणारा प्रश्न एका झटक्यात निकालात; आमदार समाधान आवताडेंचा ‘तो’ मास्टरस्ट्रोक नेमका काय?

October 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा