टीम मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन ।
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांनी १५ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज कुमार यांनी केले आहे.
शेतमाल,शेळया आणि परसबागेतील कुक्कूटपालन यांच्या मूल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष , अर्जाचा नमूना यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थामध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ , महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.
पात्र खरेदीदारामध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कार्पोरेटस , प्रक्रियादार , निर्यातदार , लघु मध्यम उद्योजक , स्टार्टस अप्स , कोणताही खरेदीदार यांचा समावेश आहे.
प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी स्पर्धात्मक व उत्कृष्ठ अर्जाना प्रकल्पाचे ६० टक्क्यापर्यंत अनुदान उपलब्ध होईल.
इच्छूकांनी आपले अर्ज १५ डिसेंबर पर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन कुमार यांनी केले आहे.
आमच्या ब्रेकफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप्प आयकॉन वर क्लिक करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज