टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरगाड्यात अडकलेल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचं काम बचत गट करतात. मात्र सक्षमीकरणाच्या वाटेवर बसलेल्या महिलांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्या भोवती अंधश्रद्धेचा ट्रॅप लावण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवीमध्ये समोर आला आहे.
धाराशिवमधील तांदुळवाडी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सचिवांनी आपली विश्वासात घेऊन फसवणूक केल्याचा आरोप बचत गटातील इतर महिलांनी केला. पैसे मागायला गेल्यावर अंगात दैवी शक्ती असल्याच सांगत धमकावत असल्याचं महिला म्हणाल्या.
महिलांना काळ्या जादूची भीती दाखवली जात आहे. गावात भीतीचं वातावरण असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांची भेट घेत समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
पैसे घेतले, परत मागितल्यावर काळ्या जादूचा धाक
बचत गटाच्या सचिवाने महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लाखो रुपये उचलले. भिसी, मायक्रो फायनान्स आणि बचत गटाच्या माध्यमातून पैसे घेतल्यानंतर परतफेडीचा विषय निघताच आरोपीने अंगात देवी आल्याचा दावा करत महिलांना धमकावलं. एवढंच नव्हे,
तर महिलांच्या घरासमोर लिंबू, सुया आणि राख टाकण्याचे प्रकार सुरू झाले. वंशाचा दिवा संपवण्याची धमकी देऊन महिलांना मानसिक त्रास दिला जात असल्याचंही समोर आलं आहे.
CCTVमध्ये कैद झाले संशयास्पद प्रकार
बचत गटाच्या नावाखाली धाराशिवच्या तांदूळवाडीत जवळपास 40 महिलांना फसवण्याचा प्रकार घडलाय. आधी गोड बोलून पैसे घेतले आणि पैसे परत मागायला गेल्यावर काळ्या जादूची भीती घालत महिलांच्या घरात लिंबू, सुया, राख टाकत अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत वंशाचा दिवा संपवण्याची धमकी दिली.
आरोपी महिलेला दोन व्यक्तीकडून काळ्या जादूचे धडे दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. दिवे लावत, पूजा मांडत भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असताना घरात घरात राख, लिंबू टाकताना CCTV त संशयास्पद हलचाली कैद झाले आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर गावात भितीचं वातावरण असून, महिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही गावाला भेट देत महिलांशी चर्चा केली. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका, असा सल्ला देण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित महिलांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे तांदुळवाडीत खळबळ उडाली असून महिलांनी बचत गटांमध्ये गुंतवणूक करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज