मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढ्यातील स्मारक अजूनही प्रलंबित आहे. या राष्ट्रीय स्मारकासाठी समाजबांधवांना सोबत घेऊन आंदोलन उभारू, असे बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी जाहीर केले.
बसव ब्रिगेडच्या वतीने महेश (मुन्ना) थोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण बुधवारी झाले.
यावेळी ते बोलत होते. हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला आमदार प्रणिती शिंदे, तेलंगणातील लिंगायत नेते पी. संगमेश्वर, वेण्णा ईश्वरप्पा,
माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, सिद्धेश थोबडे, एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, पैनगंगा बँकेचे अध्यक्ष कमलकिशोर तावडे,
बसव ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष वायचळ, बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे आदी उपस्थित होते.
भोसीकर म्हणाले, महाराष्ट्रात सव्वा कोटी लिंगायत समाज आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लिंगायत समाजाकडे मात्र राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लिंगायत समाजाला मंत्रिपदे मिळणे आवश्यक आहे.
याप्रसंगी राहुल जत्ती, बसवराज चाकई, शिवराज विभुते, नितीन गंगदे, शरणकुमार कुंभार, ॲड. विनयकुमार कटारे, धोंडप्पा तोरणगी, सचिन चौगुले आदी उपस्थित होते. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन केले.
यांचा विशेष सन्मान
बसव ब्रिगेडतर्फे वीरभद्रप्पा जोजन, शशिकला रामपुरे, पौर्णिमा तोड अंजली शिरसी, रोहिणी चौधरी, श्याम पाटील, उस्मान शेख, सिद्धेश्वर प्रशाला माजी विद्यार्थी मित्र परिवार, नवनीत नडगेरी यांचा सामाजिक कार्यासाठी विशेष सन्मान करण्यात आला.
यांचा पुरस्काराने गौरव
बसव ब्रिगेडतर्फे सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला तर महाराष्ट्र जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त रमेश भुमे,
युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे विशाल बगले, राजश्री थळंगे, सोमनाथ जाणते, श्वेता डोंबे, प्रा. विजय बिज्जरगी, साकव फाउंडेशन यांना बसवरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.(स्रोत; लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज