टीम मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. ज्यामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.

दरम्यान मंगळवेढा बाजारात समितीत उद्या गुरुवार दि.२९ जानेवारी रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खरेदी-विक्री लिलाव बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सभापती सुशील आवताडे यांनी दिली आहे.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला विभाग, डाळींब विभाग आदी विभाग तसेच इतर सर्व विभाग बंद राहणार आहे.

शेतमाल विक्रीस आणू नये
गुरुवारी मंगळवेढा बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणू नये अशा सूचना बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262


“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














